हॅपनिंग

केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये पीक कर्जाचे लक्ष वाढवण्याची शक्यता…

देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे यासाठी आगामी अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये कृषी कर्जाचे लक्ष चालू आर्थिक वर्षासाठी १६.५ लाख कोटी रुपयांवरून १८ ते १८.५ लाख कोटी रुपये पर्यंत वाढवली जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर 8 जानेवारीला कार्यशाळा.. आता त्रिस्तरीय मत्स्य पालनातून मिळवा तिप्पट उत्पन्न..

अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर व्याज सवलत…
सरकार दरवर्षी बँकिंग क्षेत्रासाठी एका वर्षासाठी कृषी कर्जाचे टार्गेट निश्चित करते व त्यामध्ये पीक कर्जाचा देखील समावेश असतो. अलीकडेच कृषी कर्जाचा ओघ सातत्याने वाढत असल्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये कृषी कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. सरकारकडून अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर व्याज सवलत कृषी क्षेत्रात अधिक उत्पादनासाठी पतपुरवठा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात 8 जानेवारीला अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

 

संस्थात्मक कर्ज तसेच शेतकरी गैर संस्थेकडून जास्त व्याजाने कर्ज घेणे टाळण्यास सक्षम आहेत. शेतीशी निगडित जे काम आहे त्यांच्यासाठी साधारणपणे ९% व्याजाने कर्ज दिले जाते. परंतु शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज देण्यासाठी सरकार अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर व्याज सवलत देते.

व्याजदर..
अल्पमुदतीच्या ३ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर सरकार २% व्याज अनुदान देते. त्याच्या पुढील म्हणजे 2 लाखांपेक्षा अधिकच्या पीक कर्जावर शेतकऱ्यांना ७% आकर्षक व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. शिवाय घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३% प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. म्हणजेच त्यांच्यासाठी कर्जावरील व्याजदर फक्त ४% असतो.

 

Related Articles

Back to top button