मुंबई : कृषी क्षेत्रात आता तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे. शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी आता नवनवीन तांत्रिक उपकरणेही वेगाने विकसित केली जात आहेत. उत्तर प्रदेशातील दोन आयआयटी इंजिनीअर्सनीही आता शेतकऱ्यांच्या सोयीचे साधने बनवायला सुरुवात केली आहे. त्यांनी बनवलेल्या एका साधनांमुळे पिकांची कापणी करणे आता सोपे झाले आहे. शिवाय, ‘या’ साधनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार आहे.
कानपूरच्या या दोन अभियंत्यांनी कधीच विचार केला नसेल, की आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी अशी साधने बनवू ज्यामुळे त्यांची मेहनत कमी होईल.
अनंत चतुर्वेदी यांनी कानपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी साधने बनवण्यासाठी विकल्प नावाचा एक स्टार्टअप सुरू केला आहे. त्याने सिथ (Scythe) नावाचे एक साधन बनवले आहे. हे साधन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याद्वारे शेतकरी चारा कापणीपासून ते भात, गहूपर्यंत सर्व प्रकारची उभी पिके काढू शकतात. या साधनाची किंमतही खूपच कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रमही वाचतात. “सिथ”चा अर्थ होतो विळा, कोयता किंवा कापणीचे साधन.
तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |
पिकांची कापणी सुलभ झाली
वीज आणि डिझेलशिवाय चालणाऱ्या सिथ नावाच्या या उपकरणात पीक मुळापासून कापण्याची क्षमता आहे. त्याची कापणी होत असल्याने शेतातील रान जाळण्याची गरज नाही. या उपकरणाच्या साहाय्याने शेतकरी 24 तासांत 2 बिघेमधील गहू काढू शकतो. या यंत्राद्वारे भात, गहू, बाजरी, नाचणी आणि मका याशिवाय चारा पिके देखील काढली जाऊ शकतात. 1 एकर जमिनीवर कापणी करताना 15,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा भुसा आणि धान्य कम्बाइन मशीनद्वारे वाया जाते. या साधनाच्या वापराने मात्र शेतकरी 100% पीक काढून घेऊ शकतो.
शेतकऱ्यासाठी सिथ हा स्वस्त पर्याय
शेतकऱ्याचे श्रम आणि वेळ वाचवण्यासाठी विकास संस्थेचे संचालक अनंत चतुर्वेदी यांनी अनेक कृषी यंत्रे बनवली आहेत. शेतकऱ्याला शेतीत असे नवनवीन पर्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्याची मेहनत वाचेल आणि उत्पन्न वाढेल. आनंद चतुर्वेदी सांगतात, “सिथ टूल हा एक उत्तम पर्याय आहे. कंबाईन मशिनच्या साह्याने कापणी करणे शेतकऱ्यांना महागात पडते. मात्र सिथ टूलच्या सहाय्याने शेतकरी आपले पीक सहज काढू शकतो. हाताने चालवायच्या या सिथची किंमत फक्त ₹ 7,500 आहे. वर्षभरातील तिन्ही हंगामात हे उपकरण शेतकऱ्यासाठी उपयुक्त ठरते.
सिथ टूलमुळे होणारे फायदे
सिथमुळे कंबाईन मशीन मागवण्यापासून शेतकऱ्यांची सुटका होते. Scythe उपकरणाच्या साहाय्याने शेतकरी स्वयंपूर्ण होण्याबरोबरच त्यांचे श्रम वाचवतात. पेंढा जाळल्याने मरणाऱ्या उपयुक्त कीटकांना हे साधन वाचवते. जमिनीची सुपीकताही चांगली राहते. या उपकरणाचा वापर केल्याने शेतातील माती अधिक उत्पादक बनण्यास मदत होते.
“विकल्प”ची कृषी साधने इथे खरीदता येतील – https://www.vikalp.tech/shop