ॲग्रोवर्ल्डचा कृषी ज्ञानयज्ञ

ॲग्रोवर्ल्ड गेल्या पाच वर्षांपासून कृषी व ग्रामविकास विस्ताराच्या क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव बनले आहे. त्यासाठी टीम ॲग्रोवर्ल्ड निरंतर परंतु विश्वासपूर्वक हळूहळू एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. ॲग्रोवर्ल्ड “ॲग्रोवर्ल्ड फार्म” या कृषी मासिकाच्या माध्यमातून राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहे. शेती व शेतीपूरक जोडधंदे, प्रक्रियाउद्योग या विविध कार्यशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ॲग्रोवर्ड पब्लिकेशनच्या (प्रकाशन) माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध विषयांवरील साध्या व सोप्या भाषेतील पुस्तकांची मालिका उपलब्ध करून दिली आहे.

ॲग्रोवर्ल्डच्या व्हाट्सअप ब्राडकास्ट तसेच वेबसाईटच्या माध्यमातून रोज सुमारे चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत शेतीविषयक माहिती, तंत्रज्ञान, यशोगाथा, शासकीय योजना कोणतेही शुल्क न घेता गेल्या दोन वर्षांपासून पोहोचविल्या जात आहेत. उत्तर महाराष्ट्रात जळगाव व धुळे येथे होणाऱ्या ॲग्रोवर्ल्डच्या दोन कृषी प्रदर्शनांचा दोन लाखांहून अधिक शेतकरी थेट लाभ घेतात. अशा प्रकारे कृषी व ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या ॲग्रोवर्ल्डने शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हा कृषी ज्ञानयज्ञ आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालविला आहे आणि पुढे देखील तो निरंतर सुरूच राहील. धन्यवाद…!