Home शासकीय योजना कडधान्य बियाण्यांसाठी शंभर टक्के अनुदान; रब्बी हंगामातील हरभरा उत्पादकांना फायदा

कडधान्य बियाण्यांसाठी शंभर टक्के अनुदान; रब्बी हंगामातील हरभरा उत्पादकांना फायदा

0
52
कडधान्य बियाण्यांसाठी शंभर टक्के अनुदान

मुंबई : कडधान्य आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत कडधान्यांची लागवड आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी यापुढे केंद्र सरकारकडून कडधान्य लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे. यापूर्वी २५ ते ३० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत होते. त्यामुळे कडधान्य लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होत नव्हते. कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी व कडधान्यांमध्ये देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी कडधान्य आत्मनिर्भर योजना केंद्र सरकारकडून राबविली जाते. त्यामध्ये केंद्राचा वाटा ६० टक्के व राज्याचा वाटा ४० टक्के आहे. योजनेमध्ये प्रमाणित बियाणे वितरण हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादकतेमध्ये निश्चितच वाढ होते, परंतु या योजनेमध्ये बियाणेसाठी देण्यात येणारे अनुदान जेमतेम २४ ते ३० टक्के होते.



📞 Call Now

📞 Call Now

शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे बियाणे वितरण आणि लागवड क्षेत्राचे उद्दिष्ट पूर्ण होत नव्हते. त्यामुळे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रमाणित आणि सत्यप्रत बियाणांसाठी शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन चौहान यांनी शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)

 
📞 Call Now

📞 Call Now

विदर्भ, मराठवाड्याला दिलासा

राज्यात रब्बी हंगामात हरभरा मुख्य पीक असून, लागवडी खालील क्षेत्र सरासरी २८ लाख हेक्टर आहे. यापैकी बहुतांश लागवड विदर्भ आणि मराठवाड्यात होते. कृषी विभागाकडून महाबीज किंवा राष्ट्रीय बियाणे महामंडळच्या बियाणांची वाटप केले जाते. पण, अनुदान कमी असल्यामुळे शेतकरी खुल्या बाजारातून बियाणांची खरेदी करतात किंवा अन्य पिकाची लागवड करतात. आता सत्यप्रत आणि प्रमाणित बियाणांसाठी जवळपास शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील हरभरा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. कृषी विद्यापीठांनी संशोधन करून नुकतेच बाजारात आणलेल्या नव्या संकरीत वाणांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे क्षेत्र वाढीसह उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.

गहू, हरभरासह सहा पिकांच्या हमी दरात वाढ

 

रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

“कडधान्य पिकाखालील क्षेत्र खरीप हंगामात सरासरी २० लाख हेक्टर आणि रब्बी हंगामात ३० लाख हेक्टर असते. आगामी रब्बी हंगामात सुमारे २५ ते २८ लाख हेक्टरवर हरभरा लागवड होईल, त्यासाठी हरभरा बियाणे शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तूर, उडीद, मसूर व हरभरा बियाण्यांना अनुदान मिळेल. राज्यात कडधान्याखालील क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होईल. रब्बी हंगामात हरभरा पेरणाऱ्या शेतकऱ्यांनी या अनुदानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
— दत्तात्रय भरणे,
कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here