बाजार भाव

कांद्याच्या दरात सुधारणा ; वाचा आजचे बाजारभाव

पुणे : नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेड मार्फत युएई आणि बांगलादेशला कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार बांगलादेशला 64,400 टन तर युएई 14,400 टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. यानंतर कांद्याच्या भावात अल्प सुधारणा झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याला आज पुणे -पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला दर मिळाला. येथे कांद्याला जास्तीत जास्त दर हा 1,600 रुपये तर सर्वसाधारण दर हा 1,450 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच कांद्याची सर्वाधिक आवक ही पुणे कृषी बाजार समितीत झाली. तसेच काल (दि. 6) रोजी लासलगाव कृषी बाजार समितीत कांद्याला 2,003 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. इतरही बाजार समित्यांमधील बाजारभाव खालीलप्रमाणे..

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल परिणाम आवक सर्वसाधारण दर
कांदा (7/3/2024)      
पुणे क्विंटल 19505 1200
पुणे -पिंपरी क्विंटल 25 1450
कांदा (6/3/2024)      
कोल्हापूर क्विंटल 7431 1400
अकोला क्विंटल 430 1700
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 2706 1100
मुंबई मार्केट क्विंटल 11806 1400
खेड-चाकण क्विंटल 15000 1500
सातारा क्विंटल 312 1400
अकलुज क्विंटल 335 1300
सोलापूर क्विंटल 28959 1400
बारामती क्विंटल 809 1300
येवला क्विंटल 15000 1850
येवला -आंदरसूल क्विंटल 3000 1750
अमरावती क्विंटल 489 1300
लासलगाव क्विंटल 10188 1900
लासलगाव – निफाड क्विंटल 3140 1870
लासलगाव – विंचूर क्विंटल 8700 1900
जळगाव क्विंटल 1314 1250
मालेगाव-मुंगसे क्विंटल 9000 1705
नागपूर क्विंटल 1240 1875
सिन्नर क्विंटल 2618 1650
Panchaganga Seeds

 

Nirmal Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button