बाजार भाव

कांद्याला आज काय भाव मिळाला ? ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

पुणे : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात कांदा निर्यातबंदी उठविली. तसेच बांगलादेश आणि युएईला कांदा निर्यात करण्याची मान्यता दिली. मात्र, कांद्याचे भाव बघितले तर कांद्याचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज आपण कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत.

कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये कांदा पुरवठ्याचे संकट निर्माण झाले होते. यानंतर केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात कांद्यावरची निर्यातीवरील बंदी उठवली. नंतर मार्च महिन्यात केंद्र सरकारने बांगलादेश आणि युएईला कांदा निर्यात करण्याची मान्यता दिली. यानुसार युएईला 14,400 टन तर बांगलादेशला 64,400 टन कांदा निर्यात केला जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या निर्णयानंतर कांद्याचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे.

 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कांद्याला आज पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 1600 रुपये प्रति क्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर हा 1500 रुपये प्रति क्विंटल मिळाला. तसेच काल (दि. 15 रोजी) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक ही 3304 क्विंटल झाली असून कांद्याला जास्तीत जास्त दर हा 1752 रुपये प्रति क्विंटल मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (16/3/2024)

पुणे -पिंपरी क्विंटल 6 1500
कांदा (15/3/2024)
अकलुज क्विंटल 455 1400
कोल्हापूर क्विंटल 5330 1100
अकोला क्विंटल 810 1400
मुंबई क्विंटल 13656 1350
खेड-चाकण क्विंटल 150 1350
दौंड-केडगाव क्विंटल 9272 1500
राहता क्विंटल 3934 1200
हिंगणा क्विंटल 3 1800
जुन्नर – नारायणगाव क्विंटल 8 1200
जुन्नर -आळेफाटा क्विंटल 11169 1200
सोलापूर क्विंटल 25998 1100
येवला क्विंटल 11000 1451
येवला -आंदरसूल क्विंटल 3000 1300
अमरावती क्विंटल 669 1250
धुळे क्विंटल 1207 1400
लासलगाव क्विंटल 3304 1410
लासलगाव – निफाड क्विंटल 570 1500
लासलगाव – विंचूर क्विंटल 3100 1500
जळगाव क्विंटल 1610 1202
मालेगाव-मुंगसे क्विंटल 10000 1400
नंदूरबार क्विंटल 686 1350
Panchaganga Seeds

 

Nirmal Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button