इतरशासकीय योजना

रब्बी पीक विमा: ज्वारीसाठी फक्त 25 दिवस, गहू-हरभऱ्याला 15 डिसेंबरपर्यंत वेळ; तारीख चुकली तर विमा मिळणार नाही!

मुंबई : दुष्काळाच्या सावटात रब्बीचा हंगाम सुरू होत असताना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2026 आणि रब्बी 2026-27 या एका वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. रब्बीसाठी PMFBY पोर्टल कार्यान्वित झाले असून, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोणती 7 पिके विम्याखाली येणार?

1. गहू (बागायत)
2. रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत)
3. हरभरा
4. रब्बी मका
5. उन्हाळी भात
6. उन्हाळी भुईमूग
7. रब्बी कांदा

ही पिके फक्त अधिसूचित महसूल मंडळ / क्षेत्रातच विम्याखाली येणार आहेत. तुमचे गाव / मंडळ अधिसूचित आहे का, हे आधी तपासा.

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)

पीकनिहाय अंतिम तारीख

• रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) – 30 नोव्हेंबर 2026
> ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी ही तारीख अजिबात चुकवू नये. 1 डिसेंबरला गेलात, तर पोर्टल बंद झालेले असेल.

• गहू (बागायत), हरभरा, रब्बी मका, रब्बी कांदा – 15 डिसेंबर 2026

• उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग – 31 मार्च 2027

कर्जदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा नियम
योजनेत सहभाग कर्जदार आणि बिगर-कर्जदार दोघांसाठीही ऐच्छिक आहे.

– कर्जदार शेतकऱ्याने कर्ज देणाऱ्या बँकेकडे विहित नमुन्यात अर्ज भरून द्यायचा आहे.

– जर विम्यात सहभागी व्हायचे नसेल, तर नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या किमान 7 दिवस आधी बँकेला लेखी कळवणे बंधनकारक आहे. नाहीतर आपोआप सहभाग धरला जाऊ शकतो.

अर्ज कुठे करायचा?

– http://pmfby.gov.in वर स्वतः
– कर्ज देणारी बँक
– विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट
– पीक विमा ॲप
– सामूहिक सेवा केंद्र (सीएससी)


📞 Call Now

📞 Call Now

तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी?

राज्यात जिल्हा समूहानुसार वेगवेगळ्या कंपन्या नेमल्या आहेत:

इफ्को टोकियो – अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली.

HDFC एर्गो – सोलापूर, जळगाव, सातारा, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे.

युनायटेड इंडिया – परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर.

बजाज अलायन्झ – वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार.

भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) – धाराशिव.

SBI जनरल – लातूर आणि बीड.

तक्रार / माहितीसाठी संबंधित विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार / तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी / जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

यंदा विमा घेणे जास्त का गरजेचे?

कृषी विभागाने स्पष्ट आवाहन केले आहे की, 2026-27 मध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी पीक हातातून गेले, तरी आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी विमा हाच आधार ठरू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*लक्षात ठेवा:* नुकसान झाले तर 72 तासांत तक्रार नोंदवा, पावती जपून ठेवा, आणि अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत ठेवू नका.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button