हॅपनिंग

कर्नाटकमध्ये दुधाच्या दरात 8 रुपयांची वाढ; दुष्काळात शेतकऱ्यांना थेट लाभ

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी दुधाच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या लोकप्रिय ब्रँड ‘नंदिनी’ दुधाच्या दरात प्रतिलिटर 8 रुपयांनी वाढ करण्यास सर्वानुमते मंजुरी दिली आहे. ही नवीन दरवाढ 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. याबाबत माहिती देताना मंत्री कृष्णा बायरे गौडा म्हणाले की, “या 8 रुपयांच्या वाढीपैकी 7 रुपये थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर उर्वरित 1 रुपया दूध संघांना पॅकेजिंग, वाहतूक खर्चासाठी दिला जाईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)

का वाढवले दर?

गौडा यांनी सांगितले की, शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहेत. 228 तालुके दुष्काळाने प्रभावित असून, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई, पशुखाद्य, औषधे, वाहतूक आणि प्लास्टिक पॅकेजिंगच्या वाढत्या खर्चामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. राज्यात दैनंदिन दूध संकलन सुमारे 10 लाख लिटरने घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत किमान 10 रुपये प्रतिलिटर वाढीची मागणी केली होती. विधान परिषदेत सर्वच पक्षांच्या सदस्यांनीही शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली होती.

मंत्रिमंडळात या विषयावर दोन-तीन वेळा चर्चा झाली. शेवटी 10 रुपयांऐवजी 8 रुपयांची वाढ करण्याचा संतुलित निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्याला मिळणार 47 रुपये प्रतिलिटर

सध्या शेतकऱ्यांना 35 रुपये प्रतिलिटर दर मिळतो, त्यावर सरकारचे 5 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळून एकूण 40 रुपये मिळतात. आता दरवाढीनंतर शेतकऱ्यांना मूळ दर 42 रुपये मिळेल आणि अनुदानासह एकूण 47 रुपये प्रतिलिटर मिळणार आहेत.

या दरवाढीनंतर सर्वात जास्त विकला जाणारा नंदिनीचा निळा पॅकेट (टोन्ड मिल्क) 46 रुपयांवरून 54 रुपये प्रतिलिटर होणार आहे. अंतिम किरकोळ दर संबंधित दूध संघ फॅट आणि एसएनएफ नुसार ठरवतील. हा प्रस्ताव 6 ऑक्टोबरलाच मंजूर झाला होता, मात्र विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याची अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात आली.


📞 Call Now

📞 Call Now

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button