हवामान अंदाज

नाशिक घाटमाथ्यासह खान्देशात आज पावसाची शक्यता

मुंबई : अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावातून, मंगळवारी राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने (आयएमडी) बुधवारीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याच्या आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हवामान कोरडे राहणार आहे.

नाशिकच्या घाटमाथा परिसरामध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे धुळे, नंदुरबार आणि जळगाव याठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येऊ शकतो. दरम्यान, अर्णब चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेश किनाऱ्यावर धडकणार असून अनेक राज्यात हवामान बदललेले आहे, जोरदार वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक राज्यांना सावधानतेचा इशारा जारी केला आहे.


📞 Call Now

📞 Call Now

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड इथे हवामान कोरडे राहणार आहे. रत्नागिरीमध्ये मात्र मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होताना पाहायला मिळणार आहे. पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये कोरडे हवामान असेल. सांगलीत हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह कोसळधारा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर आणि घाटमाथा परिसरामध्ये काही जागी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे इथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोलापूरमध्येही हवामान कोरडे राहणार आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे. बीडमध्ये वातावरण कोरडं राहणार आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती आणि वाशिम हे जिल्हे सोडता भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button