बंगालचा उपसागरसह अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा; दसरा-दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता… 11 जिल्ह्यांना आज-उद्या यलो अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभाग (IMD)च्या ताज्या अपडेटनुसार, दसरा-दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. राज्यातून मान्सून परत गेला असला तरी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या ईशान्य मान्सूनचा परिणाम असल्याचे सांगितले जातेय. याच ईशान्य मान्सूनमुळे सध्या दक्षिणेत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.
11 जिल्ह्यांना आज-उद्या यलो अलर्ट
हवामान विभागाने 19 आणि 20 ऑक्टोबरसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे, तर 20 ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर कमी होणार आहे.
खान्देशात ‘असे’ राहणार हवामान
उत्तर महाराष्ट्र – प्रामुख्याने कोरडे हवामान
IMD नुसार, उत्तर महाराष्ट्रात सध्या पावसाची शक्यता नाही, दुपारी हवामान कोरडे राहील.
– नाशिक: 19 ते 24 ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता नाही. सकाळी हलका गारवा, दुपारी उकाडा आणि 35-36 अंश तापमान राहील. आकाश अंशतः ढगाळ.
– धुळे: पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान 36 अंशांपर्यंत. कोरडे आणि उष्ण हवामान.
– नंदुरबार: पावसाची शक्यता नाही. पूर्णपणे कोरडे हवामान राहील.
– जळगाव: पावसाची शक्यता नाही. यवतमाळसोबतच जळगावात 36 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली होती, त्यामुळे ऑक्टोबर हिट कायम राहील.
View this post on Instagram
मराठवाडा – छत्रपती संभाजीनगर आणि जालना
मराठवाड्यातील या दोन जिल्ह्यांमध्ये फक्त अत्यल्प पावसाची शक्यता आहे.
– छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): 19-20 ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी अत्यल्प, हलक्या सरींची शक्यता, अन्यथा हवामान कोरडे. 21 ऑक्टोबरनंतर मराठवाड्यात हवामान पूर्ण कोरडे होईल.
– जालना: संभाजीनगर प्रमाणेच अत्यल्प पावसाची शक्यता. मोठा पाऊस नाही. शेतीच्या कामांना अडथळा येणार नाही.
विदर्भ – अकोला आणि बुलडाणा
– अकोला: अत्यल्प पावसाची शक्यता आहे. म्हणजे 1-2 मिमी पेक्षा कमी. तापमान 36 अंशांच्या आसपास.
– बुलडाणा: पावसाची शक्यता नाही. पूर्णपणे कोरडे हवामान राहील.
एकूणच, राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज असला तरी, उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्हे, लगतचे संभाजीनगर-जालना आणि अकोला-बुलडाणा या 8 जिल्ह्यांमध्ये दसरा-दिवाळीच्या काळात मोठा अवकाळी पाऊस होणार नाही. 19-20 ऑक्टोबरला तुरळक ढगाळ वातावरण आणि एखाद्या ठिकाणी हलकी शिडकावा होऊ शकतो, पण 20 ऑक्टोबरनंतर हवेचा दाब 1012 hPa पर्यंत वाढल्याने पाऊस पूर्णपणे उघडणार आहे.
शेतकऱ्यांनी कापणी किंवा खळ्याची कामे बिनधास्त करू शकतात, पण सकाळ-संध्याकाळच्या ढगाळ वातावरणामुळे काळजी घ्यावी.




