मुंबई : राज्यातील आजचा पाऊस कसा असेल, ते भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक विभागाने नव्याने अंदाज जाहीर करून सांगितले आहे. त्यानुसार, मध्य महाराष्ट्रात 3 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना सोमवार ते बुधवारपर्यंत पावसाचे अलर्ट, सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यात नाशिक, नंदुरबारसह कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट ते आपण जाणून घेऊया.
Monsoon Alert IMD Mumbai
राज्यात रत्नागिरीसह किनारपट्टी भाग आणि मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज, सोमवारपासून बुधवारपर्यंत 3 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. “आयएमडी”च्या Monsoon Update नुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याशिवाय, गुजरातमधील कच्छ जवळ चक्रीवादळ येऊ पाहत आहे. तेथून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या सक्रिय क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.
रत्नागिरी, रायगडला ऑरेंज; मुंबई-ठाण्याला यलो अलर्ट
“आयएमडी”ने रविवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. तो मागे घेऊन काल दुपारी सुधारित ऑरेंज अलर्ट जाहीर केला. मुंबईत काल पावसाचा जोर परवाच्या तुलनेत कमी राहिला तरीही दिवसभरात 100 मिमी पर्यंत पाऊस नोंदविला गेला. हवामान खात्याने आता रत्नागिरी आणि रायगडसाठी ऑरेंज तर सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्राच्या काही भागात कालपासून मुसळधार पावसाचे थैमान दिसून येत आहे. त्याचा जोर आता चांगलाच वाढण्याची चिन्हे आहेत.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
62 वर्षांत प्रथमच घडली दुर्मीळ घटना
यंदा तब्बल 14 इवस उशिराने मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईबरोबरच तिकडे दिल्लीत मान्सूनने दोन दिवस अगोदरच हजेरी लावली. मान्सून सुरू होण्याची सर्वसामान्य तारीख मुंबईत 11 जून तर दिल्लीत 27 जून असते. एकाचवेळी मुंबईसह दिल्लीत मान्सून दाखल होण्याची ही गेल्या 62 वर्षांतील पहिलीच वेळ आहे. IMD नेही अतिशय दुर्मीळ घटना म्हणून त्याची घोषणा केली आहे. रखडलेल्या मान्सूनने सक्रियतेनंतर अतिशय वेगात 2 दिवसात संपूर्ण भारत व्यापला. मान्सून आता आणखी वेगाने पुढे जात असून देशाचा अधिकाधिक भाग व्यापत आहे.
नाशिकला आज उद्या यलो, बुधवारी ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने नाशिकसाठी आज, 26 जून, सोमवारी व उद्या, 27 जून, मंगळवारी यलो अलर्ट जाहीर केला आहे. बुधवारी, 28 जून रोजी मात्र नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदुरबारला मंगळवार, 27 जून साठी यलो अलर्ट दिला गेला आहे.
3 दिवसातील जिल्हानिहाय अलर्ट
सोमवार, 26 जून
यलो अलर्ट : नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी
ऑरेंज अलर्ट : भंडारा, गोंदिया, नागपूर, पुणे, रायगड आणि रत्नागिरी
मंगळवार, 27 जून
यलो अलर्ट : नंदुरबार, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग, गोंदिया आणि चंद्रपूर
ऑरेंज अलर्ट : नागपूर, अमरावती, पुणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे आणि पालघर
बुधवार, 28 जून
यलो अलर्ट : नागपूर, वर्धा, अमरावती, सातारा आणि रत्नागिरी
ऑरेंज अलर्ट : नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि रत्नागिरी