हॅपनिंग

केळीच्या खोडापासून बनवलेल्या वेफर्सची अरब जगाला मोहिनी

अस्सल मल्याळी 'कल्पना'; केळी कापणीनंतर उरलेल्या अवषेशांपासून बनवला स्वादिष्ट पदार्थ

संयुक्त अरब अमिराती (युएई)मधील एका फार्मने केलेल्या अनोख्या प्रयोगामुळे, अबू धाबी येथील गल्फ फूड वीकमध्ये केळीच्या खोड (देठा)पासून बनवलेले वेफर्स (चिप्स)!हे नवीनतम नाविन्यपूर्ण खाद्य उत्पादन सादर करण्यात आले. या कल्पक रेसिपीने केरळच्या पारंपरिक खाद्यप्रकाराला एका स्वादिष्ट, मूल्यवर्धित आणि कुरकुरीत पदार्थात रूपांतरित केले, ज्यामुळे आरोग्यदायी नाश्त्यासाठी नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत. केळीच्या खोडापासून बनवलेल्या या वेफर्सनी अरब जगाला मोहिनी घातली आहे. आता दुबई, अबू धाबी आणि फुजैरा येथील सुपर स्टोअर्समध्ये हा माल हातोहात खपत असून त्याला आगाऊ बुकिंगद्वारे प्रचंड मागणी निर्माण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)

केळीच्या खोडापासून बनवलेल्या ह्या चिप्स, भरपूर चव आणि हिरव्या भाज्यांसह मल्याळी लोकांसह शेख मंडळींच्या स्वयंपाकघरातही लोकप्रिय खल होत आहेत. फुजैरामधील अहमद अल हफीती यांच्या ‘वादी दाफ्ता प्लांटेशन’च्या वनस्पती उद्यानात केळीचे खोड व अवशेष वापरून ह्या चिप्स तयार करण्यात येत आहेत. केळीच्या खोडाचे उभे लांबुळके काप करून, मीठ लावून तळून ह्या चिप्स तयार करण्यात आल्या. या प्रयोगाच्या यशानंतर, मसालेदार आणि गोड चवींच्या चिप्सचे आणखी तीन प्रकार बाजारात आणण्याची तयारी सुरू आहे.

या चिप्समागील कल्पना ही मूळच्या केरळमधील मलप्पुरम परिसरातील पुथनाथानी येथील रहिवासी मोहम्मद सालेह यांची सूचना आहे. अबू धाबीमधील ‘गल्फ फूड वीक’मध्ये एक नवीन उत्पादन सादर करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून सूचना घेत असताना सालेह यांनी केळीच्या खोड अन् अवशेषापासून चिप्सची शक्यता मांडली. लिंबू, आंबा, पपई इत्यादींपासून लोणची आणि केळीच्या चिप्स बनवणाऱ्या या फर्मने केळीच्या चिप्स वापरून लोणचे बनवून पाहावे, अशी मोहम्मद सालेह या कर्मचाऱ्याची मूळ सूचना होती. या कल्पनेवर बरीच चर्चा झाली आणि शेवटी हा प्रयोग लोणच्यावरून देठाच्या आरोग्यदायी चिप्सकडे वळला.


📞 Call Now

📞 Call Now

एकूणच यूएईच्या फुजैराह येथील हा प्रयोग केरळच्या मातीशी जोडलेला आहे, कारण केरळमध्ये सहज उपलब्ध असलेल्या केळीच्या देठ अन् कापणीपश्चात अवशेषांचे, चिप्ससारख्या मूल्यवर्धित खाद्यपदार्थांमध्ये रूपांतर करण्याची शक्यता केरळच्या भूमीतूनच आली आहे. विविध देशांतील फळे, भाजीपाला आणि वनस्पतींची लागवड करणाऱ्या या कंपनीच्या शेतांवर असे वेगळे प्रयोग सामान्यपणे केले जातात. लॅव्हेंडर आणि कोरफडीपासून बनवलेले साबण, तसेच आंबा, पपई आणि लिंबापासून बनवलेली लोणची हे देखील या प्रयोगांचा भाग आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या हवामानासाठी अनुकूल बियाणे आणि शेती पद्धती शोधण्याचे प्रयत्नही सध्या कंपनीकडून सुरू आहेत.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button