मुंबई : Today’s Cotton Rate… कापसाच्या भावात सध्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ७७०० रुपये दर मिळाला. तसेच रविवार (दि. १६) रोजी मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीत ७८०० रुपये दर मिळाला असून ३५० क्विंटल आवक झाली.
भारत चीनला मोठ्या प्रमाणात कापूस विकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस पिकाच्या बदल्यात प्रत्येक वेळी चांगला भाव मिळतो. मात्र, चीनमधील बदलत्या परिस्थितीमुळे चीन सरकारने आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कापसाचे बाजारभाव बदलताना दिसत आहेत.
बाजार समिती |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस |
||
16/04/2023 | ||
मंगरुळपीर | 350 | 7800 |
15/04/2023 | ||
मनवत | 2900 | 8050 |
किनवट | 46 | 7550 |
समुद्रपूर | 1030 | 7900 |
वडवणी | 117 | 7700 |
हिंगणा | 25 | 7900 |
आर्वी | 1482 | 8000 |
पारशिवनी | 1160 | 7850 |
उमरेड | 1195 | 7800 |
देउळगाव राजा | 3000 | 7900 |

