Home बाजार भाव कापसाच्या भावात वाढ ; पहा कुठे मिळतोय सर्वाधिक दर

कापसाच्या भावात वाढ ; पहा कुठे मिळतोय सर्वाधिक दर

कापसाच्या भावात वाढ

पुणे : राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाच्या आवकेत घट होत असून निर्यात आणि देशांतर्गत कापसाची मागणी वाढली आहे. यामुळे कापसाच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कापसाला 7,000 ते 7,500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. दरम्यान, कापसाला आज सर्वाधिक दर हा देउळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. चला तर मग जाणून घेऊया इतरही बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाला देउळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला दर मिळाला असून येथे कापसाला जास्तीत जास्त दर हा 8,100 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच हिंगणघाट कृषी बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त 7,785 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक देखील हिंगणघाट कृषी बाजार समिती झाली. इतरही बाजार समित्यांमधील कापूस भाव खालीलप्रमाणे.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (28/2/2024)

अमरावती क्विंटल 79 7350
मारेगाव क्विंटल 1552 7100
पारशिवनी क्विंटल 1496 7000
उमरेड क्विंटल 382 7100
देउळगाव राजा क्विंटल 1000 7575
वरोरा क्विंटल 3077 6700
वरोरा-माढेली क्विंटल 1200 7000
वरोरा-खांबाडा क्विंटल 1584 6700
नेर परसोपंत क्विंटल 4 6500
काटोल क्विंटल 174 7000
हिंगणा क्विंटल 21 6800
हिंगणघाट क्विंटल 10000 6500
सिंदी(सेलू) क्विंटल 2460 7500
Planto Krushitantra
Ajeet Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇