Home हवामान अंदाज राज्यात पुन्हा पाऊस वाढणार; मान्सून ट्रफ सक्रिय

राज्यात पुन्हा पाऊस वाढणार; मान्सून ट्रफ सक्रिय

0
10

मुंबई- भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने गुरुवारी जाहीर केलेल्या येत्या दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत मान्सून कोकण किनारपट्टीवर सक्रिय राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, मुंबईच्या आसपास मुक्कामी असलेला पाऊस आता महाराष्ट्रात सर्वदूर पुन्हा एकदा कृपा करण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र झाल्यामुळे राज्यभरात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी मुंबई, कोकण-गोव्यासह विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

14 ऑगस्ट रोजी सकाळी 5:30 वाजताच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र झारखंड, जमशेदपूर, पुरुलियाच्या आसपास केंद्रीत आहे. येत्या 24 तासांत ते झारखंड ओलांडून पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
14 ऑगस्ट रोजी सकाळी 5:30 वाजताच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र झारखंड, जमशेदपूर, पुरुलियाच्या आसपास केंद्रीत आहे. येत्या 24 तासांत ते झारखंड ओलांडून पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील पावसाच्या पुनरागमनामागे बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राने निर्माण केलेली मध्य भारतातील हवामान प्रणाली महत्त्वाची ठरत आहे. कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य प्रदेशातून पुढे सरकेल, तसेच पश्चिम किनारपट्टीजवळ मान्सून ट्रफ सक्रिय झालेला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होणार आहे. परिणामी, अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि वातावरणातील अनुकूल स्थितीमुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढली आहे.

* यंदाच्या मान्सून हंगामात 13 ऑगस्ट अखेर झालेल्या राज्यातील एकूण पावसाची स्थिती. (लाल रंगाच्या भागात पावसाची मोठी तूट आहे, तर हिरव्या रंगाच्या भागात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. निळ्या भागात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे.)
* यंदाच्या मान्सून हंगामात 13 ऑगस्ट अखेर झालेल्या राज्यातील एकूण पावसाची स्थिती. (लाल रंगाच्या भागात पावसाची मोठी तूट आहे, तर हिरव्या रंगाच्या भागात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. निळ्या भागात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे.)

खान्देशसह नाशकात पाऊस

पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, ते येत्या 24 तासांमध्ये झारखंड ओलांडून वायव्य दिशेने प्रवास करेल. त्यानंतर याची तीव्रता कमी होईल; मात्र याचा प्रवास वायव्य दिशेने होत राहील. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वाहणारे वारे नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांवर पसरले आहे, त्यातून निर्माण झालेल्या चक्रीय वातस्थितीतून संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

ढगांची स्थिती दर्शविणारे आजचे उपग्रह छायाचित्र
ढगांची स्थिती दर्शविणारे आजचे उपग्रह छायाचित्र

विदर्भात पावसाची तूट

यापूर्वी ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने विशेषतः विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची तूट वाढली होती. नागपूर विभागातील पावसाची तूटही या काळात वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. आता राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी अपेक्षित आहेत.

आजचा, 14 ऑगस्ट रोजीचा पावसाचा अंदाज

आजच्या अंदाजानुसार पुणे आणि सातारा घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आल्याचे ताज्या हवामान अहवालांत नमूद आहे.

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here