• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मुंबईसह महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात!

यंदा मार्चमध्ये ऐतिहासिक उकाडा; सरासरीपेक्षा 7.6 अंशांनी जास्त तापमान; आरोग्य विभागाचा नागरिकांना सावधानतेचा इशारा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 16, 2026
in हवामान अंदाज
0
मुंबईसह महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई व संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाच वेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे. यंदा मार्चमध्येच ऐतिहासिक उकाडा जाणवू लागला आहे. मुंबईत सरासरीपेक्षा 7.6 अंशांनी जास्त तापमान असून आरोग्य विभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

मार्चच्या या असह्य उकाड्याने महाराष्ट्रातील नागरिकांना आगामी उन्हाळ्याची चाहूल आधीच दिली आहे. हवामान बदलाचा हा ताजा इशारा गांभीर्याने घेऊन यंत्रणा आणि नागरिक दोघांनीही सज्ज राहणे आवश्यक आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी येत्या काही दिवसांत वादळी पाऊस व विजांसह यलो अलर्ट जारी केला आहे; मात्र मुंबई व एमएमआर क्षेत्रात तूर्तास पावसाची शक्यता नाही.

तापमानाचे आकडे धडकी भरवणारे
मुंबईच्या सांताक्रूझ हवामान केंद्राने 11 मार्च रोजीच या हंगामातील तब्बल 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले, जे मागील पाच वर्षांतील मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान ठरले. हे तापमान सरासरीपेक्षा 7.6 अंशांनी जास्त असल्याने त्याची ‘तीव्र उष्णतालाट’ (Severe Heatwave) म्हणून नोंद झाली. डहाणूतही सरासरीपेक्षा 9.6 अंश जास्त तापमान नोंद झाले आहे..

काल मुंबईतील ओशिवरा येथे 38.6 अंश, विद्याविहारमध्ये 37.9 अंश, चेंबूरमध्ये 37.1 अंश आणि दहिसरमध्ये 36.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राम मंदिर (जोगेश्वरी) येथे 42.5 अंश आणि विक्रोळीत 41.7 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचल्याने मुंबईकरांची दमछाक होत आहे.

उर्वरित महाराष्ट्र विदर्भ ते कोकण
विदर्भातील अमरावती येथे कमाल 42.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर चंद्रपूरचा पारा 41.2 अंशांपर्यंत पोहोचला. डहाणू येथे 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले जे सरासरीपेक्षा तब्बल 9.6 अंशांनी जास्त होते, तर ठाण्याने 39.2 अंश सेल्सिअस नोंदवले.

गेल्या काही वर्षांशी तुलना
मुंबईत मागील पंधरा वर्षांपासून म्हणजे 2011 पासून दरवर्षी मार्चमध्ये 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले जात आहे; मात्र मार्च 2020 हा अपवाद ठरला, जेव्हा तापमान 37.5 अंशांपर्यंतच मर्यादित राहिले. मुंबईत सामान्यतः 10 मार्चच्या आसपास तापमान 35-36अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते; परंतु यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात इतके उच्च तापमान नोंदवणे, हे गेल्या दशकात प्रथमच घडले आहे. मुंबईतील मार्च महिन्यातील सर्वकालिक उच्चांक 28 मार्च 1956 रोजी 41.7 अंश सेल्सिअस एवढा होता.

 

 

वाढत्या उष्णतेमागील कारणे
पूर्वेकडील वारे आणि दक्षिण गुजरात व लगतच्या भागांवरील प्रतिचक्रीय वायुभ्रमण (Anticyclonic Circulation) यामुळे तापमानात ही वाढ झाली आहे, असे हवामानशास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. समुद्री वाऱ्यांचा (Sea Breeze) प्रभाव कमकुवत झाल्याने शहर थंड होण्याची प्रक्रिया रखडली आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, हवामान बदल आणि बदलत्या वायुमंडलीय स्थितींमुळे भविष्यात अशा तीव्र उष्णतेच्या घटनांची वारंवारिता वाढण्याची शक्यता आहे.

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
महाराष्ट्र आरोग्य विभागाने इशारा दिला आहे की, मानवी शरीराचे सामान्य तापमान 36.4 ते 37.2 अंश सेल्सिअस असते; परंतु उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ, हातापायांना सूज, स्नायू पेटके यांसारखी सौम्य लक्षणे दिसू शकतात, तर गंभीर प्रकरणांमध्ये उष्माघात, गोंधळ आणि हृदय, श्वसन तसेच मूत्रपिंड संबंधित आजारांची तीव्रता वाढू शकते.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी — आरोग्य विभागाचे आवाहन

पाणी भरपूर प्या — दर तासाला किमान एक ग्लास पाणी पिणे आवश्यक; तहान लागण्याची वाट पाहू नका.

उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा — सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत कामाशिवाय बाहेर जाणे टाळावे.

हलके, सैल व सुती कपडे घाला — गडद रंगाचे कपडे टाळावेत.

भरपूर क्षार हवेत – ORS, ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत घ्या, शरीरातील क्षार व पाण्याचे संतुलन राखा.

मुले, वृद्धांची काळजी घ्या – लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांची विशेष काळजी घ्या.

उष्माघात लक्षणे ओळखा – डोके दुखणे, चक्कर येणे, घाम न येणे ही उष्माघाताची चिन्हे आहेत. अशावेळी तातडीने डॉक्टरांना दाखवा.

लहानग्यांना सांभाळा – वाहनात लहान मुले व प्राण्यांना एकटे सोडू नका.

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

  • भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!
  • चालू गळीत हंगामात 12% वाढीव साखर उत्पादन; युद्धामुळे निर्यात प्रभावित झाल्याने दरांमध्ये घसरणीची शक्यता!

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उष्णतेची लाटमहाराष्ट्र
Previous Post

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

Next Post

नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची उन्हाच्या आगीत होरपळ!

Next Post
नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची उन्हाच्या आगीत होरपळ!

नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची उन्हाच्या आगीत होरपळ!

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish