पशुसंवर्धन

Cattle market closed : लम्पी रोगाच्या संकटामुळे गुरांचे बाजार बंद !

नंदूरबार : Cattle market closed… महाराष्ट्र राज्यात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) धोका वाढला असून पशुपालक चिंतेत आहे. दरम्यान, आता लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून, गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. जनावरांचे बाजार बंद केल्यामुळं नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं राज्यातील सर्वच जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका नंदूरबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीला (Nandurbar Agricultural Produce Market Committee) बसत आहे.

भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I

लाखो रुपयांची होत असते उलाढाल

नंदूरबार जिल्ह्यातल्या तळोदा, अक्कलकुवा आणि नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात जनावरांचे बाजार भरत असतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, लम्पी प्रादुर्भावानंतर बाजार समितीमधील जनावरांचे बाजार बंद असल्यानं रब्बी हंगामासाठी बैल खरेदी करणाऱ्या तसेच ऊस तोडणीसाठी बैल जोडी खरेदी करणाऱ्या ऊस तोड कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून आता त्यामुळं बैल बाजार कधी सुरु होणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.

Legend Irrigation

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत इतक्या कोटींची उलाढाल ठप्प

लम्पी स्कीन आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या दोन महिन्यांपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा गुरांचा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. लम्पी या संसर्गजन्य आजारामुळं गुरांच्या खरेदी विक्रीतून त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बाजार बंद करण्यात आले आहेत. मात्र, यामुळं 35 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

Neem India

शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच व्यापारीही या ठिकाणी येत असतात. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, हा गुरांचा बाजार बंद असल्यानं ही उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळं शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे. वाढत्या लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळं धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा जनावरांचा बाजार बंद करण्यात आला आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button