पूर्वजा कुमावत
ऊन वाढत जाते तस तसा जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होतो. चारा मिळत नसल्यामुळे जनावरांना कोरडा चारा खावा लागतो. किंवा तेही मिळाल नाही तर जनावरांची उपासमार होते. चारा टंचाई आणि उपासमारीमुळे जनावरांमध्ये विविध आजार आणि समस्या दिसून येतात. यासाठी हायड्रोपोनिक तंत्रांचा वापर करून आपण आधुनिक पद्धतीने हिरवा चाऱ्याची लागवड करू शकतो. ज्यामुळे जनावरांना हिरवा आणि पौष्टिक चारा मिळेल.
उत्पादन प्रक्रिया
हायड्रोपोनिक चारा उत्पादन घेत असताना चांगल्या बियांचा वापर करावा. कारण, तुटलेले किंवा खराब बियाणे वापरल्यास ते अंकुरित होत नाही. हायड्रोपोनिक चारा बनवण्यासाठी मका, कडधान्य किंवा गहू, हरभरे या बियांचा वापर करावा परंतु बाजरी किंवा ज्वारीच्या बियांचा वापर करू नये. थंड हवामानात गहू किंवा ओट्सच्या बिया वापराव्यात तर उष्ण हवामानात मक्याच्या बिया या हायड्रोपोनिक चाऱ्याच्या उत्पादनासाठी योग्य असतात.
बांधकाम प्रणाली
चांगल्या प्रतीचा चारा वाढवण्यासाठी आपण तापमान व आद्रतेच नियंत्रण करणे आवश्यक आहे. चारा वाढवण्यासाठी कंट्रोल लाईटची आवश्यकता असते. शेड नेट किंवा ग्रीन हाऊस बांधण्यासाठी बांबूचा किंवा लोखंडी पाईप किंवा प्लास्टिक पाईपचा वापर करावा. ही रचना कव्हर करण्यासाठी शेडनेटिंग किंवा गोणीचा वापर करावा. सुरुवातीला एक शेडनेट बांधणे, त्यानंतर 1.5×3 फूट मध्यम आकाराचा ट्रे घ्यावा व हा ड्रे चाऱ्याचे वजन धरू शकेल इतका मजबूत असावा. बिया ओलसर ठेवण्यासाठी धातूचा ट्रे न वापरता प्लास्टिकचा ट्रे वापरावा कारण धातूचा ट्रे हा सहजपणे गंजतो. अतिरिक्त पाणी काढण्यासाठी ट्रे ला 15 ते 20 लहान छिद्र करावे. शेडच्या आत ट्रे ठेवण्यासाठी बांबूचा किंवा प्लास्टिकचा रॅक बनवावा. तीन ते चार थरांचा हा रॅक असावा. प्रत्येक थरामध्ये पुरेशी जागा ठेवावी तसेच प्रत्येक लेयर साठी रॅकच्या एका बाजूला उतारा काढावा जेणेकरून ट्रे मधील पाणी बाहेर पडण्यास मदत होईल. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी त्याच्या उत्तराखाली एक छोटा ड्रेनेज लाईन बनवावी.

चारा बनवण्याची प्रक्रिया
प्लास्टिकच्या बादलीत पाच ते सात लिटर कोमट पाणी घ्यावे त्यानंतर आपण घेतलेले कडधान्य किंवा बियाणे त्या पाण्यात टाकावे. थोड्या वेळानंतर खराब बियाणे पाण्यावर तरंगताना दिसतात. ते खराब बियाणे काढून टाकावेत. त्या पाण्यात 50 ते 100 ग्रॅम मीठ घालावे कारण अंकुरित बियांना बुरशी न येण्यास मदत होते. हॅपी आणि बारा तास पाण्यात भिजवून घ्यावे व त्यानंतर बियाण्यातले पाणी काढून त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. हे धुतलेले बियाणे मोड येण्याकरता त्यांना गोणीमध्ये ठेवावेत व त्यांना उष्ण व दमट हवामानात 24 तासासाठी ठेवावे. अंकुर आलेले बिया ट्रेमध्ये टाकावेत व ते समान रीतीने पसरवावे. अंकुरलेल्या बियांना रोज हलक्या पाणी (शिंपडा) द्या. पाणी देण्यासाठी आपण स्प्रिंकलर सिस्टीम वापरू शकतो. उष्ण हवामानात दर 2 तासांनी पाणी द्यावे व थंड हवामानात 4 तासांनी द्यावेत कारण त्या बियांचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.
काळजी घेणे
1. शेडनेटमध्ये स्वच्छता ठेवावी कारण बुरशीच्या विकासाची शक्यता कमी करण्यास मदत होते.
2. अंकुरलेल्या बियांची कापणी होईपर्यंत त्यांना हाताळू नये.
3. ट्रेमध्ये नऊ दिवसांपेक्षा जास्त दिवस चारा ठेवू नये.
4. पशुंना हा चारा मिक्स करून द्यावा जसे की अर्धा कोरडा चारा व अर्धा हायड्रोपोनिक चारा
हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे
1. या चाऱ्यास पाणी कमी लागते.
2. हायड्रोपोनिक चाऱ्यात कीटकनाशकाची गरज कमी असते.
3. हायड्रोपोनिक चाऱ्यामध्ये विविध अन्नघटक चांगल्याप्रकारे उपलब्ध असतात.
4. जनावरांची खाद्य कार्यक्षमता खूप चांगली होते व त्यांना हिरवा चारा मिळाल्यामुळे ते जास्त दूध देतात.
5. हायड्रोपोनिक चाऱ्यात उच्च कार्बोहायड्रेट, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.
6. पारंपारिक कार्याच्या वाढण्यासाठी अनेकदा दोन महिने लागतात पण आपण आठवड्यात हायड्रोपोनिक चारा वाढू शकतो.
7. हायड्रोपोनिक चारास पाणी कमी लागते व आपण एक किलो हायड्रोपोनिक चारा पिकवण्यासाठी फक्त 4 ते 5 लिटर पाणी लागते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇