तांत्रिक

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – फळबाग लागवड

अ .लाभार्थी पात्रता- 

शेतकरी यांचे स्वत:चे नावे 7/12 असणे आवश्यक. जर 7/12 उतारावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमती पत्र आवश्यक. 
7/12 उतारा वर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक. 
ज्या शेतकरी यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य व त्यानंतर अन्य शेतकरी यांचा विचार करण्यात येइल (कुटुंबाची व्याख्या- पती पत्नी व अज्ञान मुले). 
लाभार्थी यांच्या मालकीची किमान 0.20 हे जमीन असणे बंधनकारक आहे.

 
ब.लागवडीसाठी पात्र फळपिके (कलमे) –
 आंबा, डाळिंब,पेरू,सीताफळ,आवळा,कागदी लिंबू,संत्रा व मोसंबी.  इच्छुक शेतकऱ्यांना लिंबू आणि सीताफळ कलमे उपलब्ध होत नसल्यास रोपांची लागवड करता येईल.

 क) अनुदान मर्यादा – 
100 टक्के. अनुदान हे 3 वर्षाच्या कालावधीत मिळनार. प्रथम वर्षी 50 टक्के, दुसरे वर्षी- 30 टक्के, व तीसरे वर्षी- 20 टक्के. 
ड.अर्ज कुठे करावा – 
इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. पूर्व संमती प्राप्त झाल्येनंतर उपविभागीय कृषि अधिकारी यांनी तांत्रिक मान्यता दिल्यावर शासकीय / नोंदणी कृत खाजगी रोपवाटिका यामधून कलमे/रोपे खरेदी करून लागवड करावी. 

                                    
इ ) आवश्यक कागदपत्रे – 
7/12 व 8 अ ) 

ई) लागवड अंतर व मिळणारे अनुदान प्रती हेक्टर –  
1. आंबा कलमे(5×5 मी) – 102530 रु. 2. पेरु कलमे (3×2 मी) – 202090 रु. 3. पेरु कलमे (6×6 मी) – 62472 रु  4. सन्त्रा (6x 3 मी) – 99716 रु. 5. सन्त्रा मोसंबी कागदी लिंबू कलमे (6x 6मी) – 62578 रु. 6. सिताफळ कलमे(5x 5 मी) -72798 रु. 7. डाळिंब कलमे(4.5×3 मी)- 109487 रु.  8. आवळा कलमे(7×7 मी) – 49735 रु.


अधिक माहिती करिता 

सौजन्य :- कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Related Articles

Back to top button