जांभळाचे ‘जामवंत’ वाण विकसित

प्रतिनिधी/ मुंबई
आपल्याला लवकरच असे जांभूळ खाण्यास मिळेल, ज्यामध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गराचे प्रमाण असून बी फारच लहान आहे. एवढेच नाही तर हे वाण अँटीडायबॅटीक आणि बायोएक्टिव्हने देखील समृद्ध आहे. कृषी वैज्ञानिकांनी जांभळाची ही नवीन जात २० वर्षाच्या प्रदीर्घ संशोधनातून विकसित केली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेशी संलग्न लखनौच्या केंद्रीय उपोष्णकटिबंधीय बागायती संस्थेच्या वैज्ञानिकांनी ‘जामवंत’ हे एक नवीन वाण विकसित केले आहे. गुजरात कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व संस्थेच्या संशोधन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. बी.एस. चुडावत यानी विविध क्षेत्रीय चाचणीनंतर या वाणाच्या व्यावसायिक शेतीसाठी २०१९ पासून संमती दिली आहे.

जांभळाचे सरासरी वजन २४ ग्रॅम असून हे जांभूळ खाण्यासाठी व प्रक्रिया दोन्हीसाठी योग्य आहेत. देशाच्या विविध भौगोलिक भागात या जांभळाचे उत्पादन आणि गुणवत्ता तपासली गेली असून देशात अनेक ठिकाणी त्याचे उत्पादन घेता येणे शक्य आहे. या वाणांच्या गुणवत्तेमुळे प्रभावित, आयटीसीने अलिगडमध्ये त्याच्या क्लस्टर लागवडीस प्रोत्साहन दिले जेणेकरुन मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी कच्चा माल सहज उपलब्ध होईल. त्याचबरोबर संस्थेने शेतकरी गट स्थापन करण्यास मदत करून जांभळाच्या व्यावसायिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.
सीआयएससीएचला देशातील बर्याच भागांतून हजारो कलमांची नियमित मागणी येत आहे. अनेकांनी या वाणाच्या चाचणीसाठी बागा लावल्या आहेत. जांभूळ मधुमेह विरोधी आणि अनेक औषधी गुणधर्मांमध्ये सरस असल्याने याच्या व्यावसायिक लागवडीसाठी शेतकरी आता पुढे यात आहेत. कलम लावलेल्या वनस्पतींनी 5 वर्षात फळ देण्यास सुरुवात केल्याने कलम बनविण्यास अजून गती आली आहे. आता लहान आकारात झाडे बनवण्याचे तंत्र संस्थेत विकसित केले गेले आहे. “जामवंत” ची वाढती मागणी लक्षात घेता संस्था हजारो कलम केलेल्या रोपांची निर्मिती करीत असून इच्छुक शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा

जांभूळ खाण्याचे फायदे
- जांभळाचं ज्यूस पाण्यात घालून ते पाणी त्वचाविकारात त्वचेला लावल्यास फायदेशीर ठरतं.
- जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अनिमिया, यावरही होतो. तसेच जांभळाच्या ज्यूसच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती वाढते.
- जांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्यानं जांभूळ खाल्ल्यानं हदयविकारापासून दहा हात दूर राहाता येतं. जांभूळ खाल्ल्यानं हदय सशक्त होतं आणि हायपरटेन्शन होत नाही.
- जांभूळ नैसर्गिकरित्या रक्त शुध्द करते. जांभळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह म्हणजेच आर्यन असतं. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानेही रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं.
- जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
- जांभूळ थंड फळ असल्यानं पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी असतं.





