हॅपनिंग

गोदाम बांधकाम योजनेसाठी आता मिळणार साडेबारा लाखांपर्यंत अनुदान… इथे करा अर्ज

जळगाव (प्रतिनिधी) – गोदाम बांधकाम योजनेअंतर्गत शासकीय अनुदान मिळते आणि यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत शेतकरी बांधव गोदाम बांधकाम योजना अंतर्गत अर्ज सादर करू शकतात.

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला (शनिवारी) जिरेनियम कार्यशाळा… मर्यादित प्रवेश..; एकरी 2 ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्नाची संधी..

 

गोदाम बांधा & आर्थिक प्रगती साधा
शेतकरी त्यांच्या शेतामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेत असतात. या पिकांच्या साठवणुकीसाठी शेतामध्ये गोदाम असणे आवश्यक असते. यासाठी शासकीय स्तरावर अनुदान देखील मिळते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माल साठविण्यासाठी जागा मिळाली तर नक्कीच त्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळू शकतो आणि यातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होऊ शकते.

गोदामाचा असाही फायदा
शेतकरी आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करून पीक घेत असतात. नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्यांना वेळ पडली तर लवकर पिकांची मळणी करावी लागते. पिकांची मळणी झाल्यावर जर शेतकऱ्यांकडे त्यांचे स्वतःचे गोदाम असेल तर ते पीक त्या गोदाममध्ये साठवून ठेवता येते. अन्यथा मिळेल त्या बाजार भावात त्याला ते विकावे लागते. आणि व्यापारी कमी किंमतीत घेतलेला हाच शेतमाल गोदामात साठवून नंतर वाढीव दराने विकून मोठा नफा कमावतात.

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व्यवस्थित साठवणूक व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासन गोदाम बांधकामासाठी अनुदान देत असते. परंतु, खूप कमी शेतकऱ्यांना गोदाम अनुदान योजनेबद्दल माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेतातील पीक साठवणुकीसाठी गोदाम बांधू इच्छित असाल तर नक्कीच ही योजना तुमच्या कामाची ठरणार आहे.

अशी आहे गोदाम बांधकाम योजना.
गोदाम बांधकाम योजनेअंतर्गत अर्ज करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. गोदाम योजना आहे तरी कशी या संदर्भात माहिती जाणून घेवू यात.

तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे करावा लागणार अर्ज…
* राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य योजना अंतर्गत मिळणार लाभ.
* जास्तीत जास्त २५० टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी मिळणार अनुदान.
* प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा साडेबारा लाख रुपये यापैकी जे कमी असेल तितके मिळणार शासकीय अनुदान.
* शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीकडून मागविले जात आहे अर्ज.
* वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषांप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करणे गरजेचे.
* जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून या योजनेविषयी अधिक माहिती घेऊ शकता.

Related Articles

Back to top button