• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कटुरले बियाणे उपलब्धता, लागवड, व्यवस्थापन

कटुरल्याचे बियाणे आणि कंद कुठे मिळतील ; जाणून घ्या.. सविस्तर माहिती....

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 24, 2023
in इतर, हॅपनिंग
0
कटुरले
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : नियमित बाजारात येणाऱ्या पालेभाज्यांसोबतच कटुरले ही रानभाजी विशेषतः आपल्याला पावसाळ्याच्या वेळेस बाजारात बघायला मिळते. करटुले ही एक दुर्मिळ रानभाजी आहे. या भाजीचा कालावधी हा जुलै ते सप्टेंबर या तीनच महिन्यांचा असतो. कटुरले रानभाजी असल्याने या भाजीत अनेक पौष्टिक घटक असतात. मुख्यत्वे ही रानभाजी रानावनात आढळते. दरम्यान कटुरल्यांचे बियाणे आणि कंद उपलब्ध झाल्यामुळे आता शेतकरी या पिकाची लागवड करू शकणार आहेत.

कटुरले हे गिलकी आणि कारले या भाज्यांप्रमाणे वेलवर्गीय पीक आहे. तसेच ही अतिशय दुर्मिळ रानभाजी आहे. याची लागवड बिया तसेच कंदांपासून करता येत असते. कंदांपासून लागवड केलेल्या कटुरल्यांच्या पिकाचे उत्पादन हे अधिक मिळते. कटुरल्यांची लागवड हलक्या ते मध्यम जमिनीवर करणे शक्य आहे यासाठी डोंगरउताराची किंवा पाण्याचा निचरा होणारी जमीन उत्तम मानली जाते. पिकासाठी उष्ण व दमट हवामान आवश्यक असते.

निर्मल रायझामिका 👇

कटुरल्यांची लागवड ही मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला केली जाते. यासाठी कंद आणि बियाण्यांच्या साहाय्याने कटुरल्यांची लागवड करता येते. कटुरले या पिकात नर आणि मादी असे वेगवेगळे वेल असतात. यांची ओळख ही वेलीच्या फुलांवरून केली जात असते. पिकाच्या फळधारणेसाठी एकूण पिकाच्या 10 टक्के नर वेल आवश्यक असतात. बियाण्यांच्या साहाय्याने लागवड केल्यास पहिल्या वर्षी पिकाची काळजी अधिक घ्यावी लागते. एकदाच करटुल्याची लागवड केल्या नंतर त्याची दुबार लागवड करावी लागत नाही. यात पिकाची लागवड झाल्यानंतर कंदांचे विभाजन होऊन एका कंदांपासून दोन ते तीन कंद निर्माण होतात. थेट कंदाच्या साहाय्याने लागवड केल्यास अधिक उत्पन्न घेता येते. पण यात नर आणि मादी पीक ओळखणे हे कठीण असते. बियाण्यांच्या साहाय्याने लागवड केल्यास आपण पुढे चालून कंदांचीही विक्री करू शकतो.

अशी करावी लागवड

कटुरले पिकाची लागवड ही जून महिन्यापर्यंत पूर्ण करावे. यासाठी जमिनीत 1.5 ते 2 मीटर अंतरावर 60 सें.मी. रुंदीचे पाट काढावेत. पाटाच्या दोन्ही बाजूस 1 मीटर अंतरावर 30x30x30 सें.मी. आकाराचे खड्डे करून त्या प्रत्येक खड्ड्यात 1.5 ते 2 किलो कुजलेले शेणखत टाकून मातीत मिसळून घ्यावे. प्रत्येक अळ्यात 10 ग्रॅम युरिया, 60 ग्रॅम सुपर फॉस्फेट, 10 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि कीटकनाशक मातीबरोबर चांगले मिसळून घेऊन प्रत्येक आळ्यात एका कंदाची लागवड करावी.

 

Ellora Natural Seeds

कटुरल्यांची बीजप्रक्रिया : कटुरल्याच्या कंदाचे कुजण्याची प्रमाण कमी करण्यासाठी त्याला कॉपर ऑक्सीक्लोराईडच्या २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळलेल्या द्रावणात बुडवून घ्यावे लागते.

खताचे व्यवस्थापन : प्रतिहेक्टरी 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 100 किलो स्फुरद व 60 किलो पालाश या पिकाला द्यावे. नत्र हे पिकाला वेळोवेळी द्यावे लागते त्याचा काही काळ ठरविण्यात आला आहे तो पुढीलप्रमाणे, लागवडीवेळी 50 किलो, लागवडीनंतर 30 दिवसांनी 50 किलो आणि 60 दिवसांनी 50 किलो नत्र द्यावे लागते. शिवाय वेल एक महिन्याचा झाल्यावर प्रत्येक वेलास 10- 15 ग्रॅम युरिया द्यावयाचा आवश्यक असतो.

आंतरमशागत : लागवडीनंतर करटोलीचे वेल जोमाने वाढू लागतात. अशा वेळी आळ्यांना मातीची भर देऊन वेलींना आधार द्यावा. आधार देण्यासाठी झाडाझुडपांच्या फांद्या किंवा बांबूचा उपयोग करावा. त्यानंतर वेलाच्या आजूबाजूचे तण खुरपणी करून काढून टाकावे.

‘या’ रानभाजीची लागवड करून मिळवा चांगला नफा👇

‘या’ रानभाजीची लागवड करून मिळवा चांगला नफा

कटुरल्याचे प्रकार :
1) (अंडाकृती आकाराचे कटुरले) – फळांचा रंग हिरवा, फळांवर मऊ काटे असतात. आकार अंडाकृती असतो. एका फळाचे वजन 10 ते 12 ग्रॅम इतके असते.
2) (मध्यम गोल आकाराची कटुरले) – फळांचा रंग हिरवा, मध्यभागी फुगीर असून फळांवरील काटे टणक असतात. एका फळाचे सरासरी वजन 13 ते 15 ग्रॅम असते.
3) (मोठ्या आकाराची गोल कटुरले) – या पद्धतीची कटुरले आकाराने मोठी असतात. यांचा रंग फिकट हिरवा असून यात बिया कमी प्रमाणात असतात. हे सर्व प्रकार एकाच प्रजातीचे असून यात फक्त आकार भिन्नता असते. यात आकाराने लहान असलेल्या कटुल्यांची मागणी जास्त आहे.

कटुरल्याची वैशिष्ट्ये : कटुल्याचे फळे कोवळी आणि स्वादिष्ट असतात, पोट साफ होण्यासाठी, पित्ताचा स्त्राव नीट होण्यासाठी हे फार उपयुक्त आहे. यात इतर वेलवर्गीय भाज्यापेक्षा पोषक द्रव्यांचे प्रमाण अधिक दिसून येते. यात पाणी 84.1 टक्के, प्रथिने 3.1 टक्के, पिष्टमय पदार्थ 7.7 टक्के, तंतुमय पदार्थ 3 टक्के. क्षार 1.1 टक्के तसेच ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. कटुरले हे औषधी गुणधर्म युक्त असल्याने ते मानवासाठी आरोग्यवर्धक आहे. वरील सर्व गुणधर्मांमुळे कटुरले हे डोकेदुखी, केसगळती, कानाचे विकार, खोकला, पोटदुखी, मूळव्याध, काविळ, डायबिटीज, लकवा, सर्पदंश, कॅन्सर आणि उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर स्वरुपाच्या आजारावर गुणकारी भाजी आहे.

 

Sunshine Power House of Nutrients

कटुरल्यांच्या बियाण्यांसाठी संपर्क

1) कृष्णा अशोकराव फालके
मो. 9545441504
2) सचिन मदनराव गायकवाड
मो. 8600860097

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • येत्या 4-5 दिवसात कोकण, विदर्भात मुसळधार सुरूच राहणार
  • आठ एकरातून 80 लाखाची कमाई!

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कटुरले बियाणेरानभाजीलागवडव्यवस्थापन
Previous Post

येत्या 4-5 दिवसात कोकण, विदर्भात मुसळधार सुरूच राहणार

Next Post

पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये द्या !

Next Post
पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना १० हजार रुपये

पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये द्या !

ताज्या बातम्या

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.