काही वर्षांत मशरूम शेती ही एक अत्यंत किफायतशीर व्यवसाय संधी म्हणून उदयास आली आहे. विशेषत: भारतासारख्या देशांमध्ये जिथे ती उत्पन्नाचा पर्यायी स्रोत म्हणून लोकप्रिय होत आहे. कमी गुंतवणुक आणि लागवडीसाठी कमी जागेची आवश्यकता असल्याने, मशरूमची शेती अनेक लहान शेतकरी आणि उद्योजकांसाठी पसंतीची निवड झाली आहे.
मशरूम शेती केवळ पौष्टिक आणि औषधी दृष्टिकोनातूनच नाही तर निर्यातीसाठीही ही शेती केली जाते. त्यासाठी आपल्याला थोडी जागा किंवा जमीन असणे आवश्यक आहे. जे लोक भूमिहीन आणि अत्यल्प भूधारक आहेत ते एखादी जागा भाडेतत्वावर घेऊन शेती करू शकतात. मशरूम शेतीचे उत्पादन सूर्यप्रकाशाशिवाय, सेंद्रिय खतावर आणि बींना सुपीक माती शीवाय ह्याची वाढ होते. मशरूम शेतीमध्ये उत्पादन देण्याची प्रचंड शमता आहे. ही शेती करण्यासाठी आपण वरचा मजला किवा मोकळ्या हवेच्या खोलीत देखील ह्याची सुरवात करू शकतो.
लागवडीपूर्वीची माहिती –
जेथे आपण लागवड करणार आहोत त्या ठिकाणी भुसा घालण्यापूर्वी संबंधित जागा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी किंवा फर्मोलीनची फवारणी करावी. रासायनिक उपचारांसाठी सिमेंटच्या टाक्यांमध्ये ९० लिटर पाण्यात १० किलो भुसा भिजत घालावा. त्यानंतर एका बादलीमध्ये १० लिटर पाणी घेऊन त्यात दहा ग्रॅम वेबिस्टीन आणि पाच मिली फार्मोलीन मिसळावे. हे द्रावण ड्रममध्ये भिजलेल्या भुसा मध्ये घालावे संबंधित ड्रमला पॉलिथिन ने झाकून ठेवावे आणि त्यावर काही वजनाची सामग्री ठेवावी. जवळ जवळ दाभोसा १२ ते १६ तास भिजवल्यानंतर ड्रम मधून पेंढा काढून त्याच जमिनीवर पसरवून ठेवावे जेणेकरून जास्त असलेले पाणी बाहेर येतं. या सगळ्या प्रक्रियेनंतर झेंडा हा मिल्की मशरूमच्या लागवडीसाठी तयार होतो.
मशरूम शेती कशी करावी –
मशरूम शेती करण्यासाठी आपल्याला अभ्यास आणि अनुभव असणे आवश्यक आहे, यासाठी आपण ऑनलाइन किवा एखाद्या कृषी विभागाच्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घेऊ शकता. तसेच आपण जे जुने मशुरूम शेती उद्धोग आहेत त्याठिकाणी जाऊन याविषयी माहिती करून घेऊन शकता.याचे ट्रेनिंग घेत असताना आपल्याला मशरूम पिकवण्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
मशरूमसाठी अन्न –
मशरूम फार्म्स मशरूम वाढवण्यासाठी सामान्यतः भूसा किंवा लाकूड पॅलेट वापरतात. मशरूमला आवडणारा सब्सट्रेट बनवण्यासाठी, तुम्हाला सेंद्रिय सॉफ्टवुड इंधन गोळ्या, लाकूड चिप्स आणि सोया हल्स खरेदी करावे लागतील. मग तुम्हाला हे दोन घटक बायोडिग्रेडेबल पिशवीत मिसळावे लागतील, आणि नंतर योग्य आर्द्रता मिळविण्यासाठी पाणी घालावे लागते. मशरूम शेती करत असताना घ्यायची काळजी मशरूम हे नाजुक असतात. त्यासाठी त्याची हाताळणी आणि काळजी घेणे महत्त्वपूर्ण आहे. हाची वाहतूक करत असताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते.
मशरूम शेती अनुदान –
ट्रेनिंग घेऊन मशरूम शेतीची सुरवात केल्याने आपल्याला सुरकरकडून अनुदान दिले जाते, तासाठी आपल्या प्रकल्पचा आराखडा तयार करून नाबार्ड किवा एनएचबी संस्थेकडून मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर आपल्याला सरकडून २०-३०% पर्यत्न अनुदान भेटते.जे लोक बेरोजगार आणि अल्पभूधारक आहेत त्यांसाठी हा व्यवसाय चांगला आहे आणि ते लोग याचे अनुदान घेऊन हा व्यवसायाची सुरवात करू शकतात. या लेखाचे तत्पर्य येवढेच की आपण शहरी लोक सुद्धा कमी जागेमध्ये व शेतकरी वर्ग सुद्धा यांची लागवड करून नफा मिळवू शकतो मशरूम तस म्हणायला गेल तर पौष्टिक व औषधी साठी खूप उपयुक्त आहे आणि आज कालच्या पिढीमध्ये Pizza सारख्या गोष्टी मध्ये मशरूम ची मागणी वाढली आहे पुढील काही वर्षात याची मागणी खुप जास्त प्रमाणात वाढेल हे नक्कीच.\
प्रा. मेघा
शांताराम साळवी
(सहायक संशोधक)