• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गोव्यातील शेतकरी करतात मगरीची पूजा!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 3, 2024
in वंडरवर्ल्ड
0
गोव्यातील शेतकरी करतात मगरीची पूजा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे नव्हे. तर त्याही पलिकडे जाऊन गोव्याची एक वेगळी ओळख सांगते येते. नैसर्गिक सौंदर्य, विपुल वन्यजीव आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक प्रथांचं ठिकाण म्हणजे गोवा. म्हणूनच गोव्याला कोकण काशी किंवा देवभूमी म्हणून ओळखले जाते. गोव्याला सण, कर्मकांड आणि प्रथांचा समृद्ध आणि सर्जनशील वारसा आहे. हिंदू पुराणांनुसार देव प्रत्येक कणाकणात आहे. त्यामुळे गोव्यात प्रत्येक स्वरूपातील देवाची पूजा करणे हे सर्वसामान्य आहे. गोव्यातील अशीच एक विलक्षण प्रथा म्हणजे मगरीची उपासना अर्थात ङ्गमानगे थापणे.

मानगे थापणे म्हणजे काय?
गोव्यातील अनेक गावात खाजण शेती करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये खाजण शेतीला सुरुवात करण्यापूर्वी पौष अमावस्येला ङ्गमानगे थापणेफ हा विधी परंपरेनुसार केला जातो. मानगे म्हणजे मगर. खाजण शेती करताना मगरींपासून कोणता त्रास होऊ नये, यासाठी मातीपासून तयार केलेल्या मगरीच्या प्रतिकृतीची पूजा करण्याची परंपरा रुढ आहे. खाजण शेतात मच्छउत्पादन तसेच शेती करणारे या दिवशी खाजण शेतात ही पूजा करतात.

नवदुर्गा देवीच्या खाजण शेतात केली जाते पूजा
ओहोटीवेळी खाजनबांधच्या आसपास असलेली चिकणमाती गोळा करतात. शिंपले, काठ्या तसंच अंड्यांचा उपयोग करून मगरीची प्रतिकृती तयार केली जाते. यानंतर हळद-कुंकू लावून तसंच नारळ व चुरमुर्‍यांचा नैवेद्य दाखवून प्रतिकृतीची पूजा केली जाते. स्थानिक भाषेत याला ङ्गमानगे थापणेफ म्हटले जाते. मानगे या शब्दाचा अर्थ मगर असून ङ्गथापणे म्हणजे घडवणे.फ फोंड्यात अडुळशी येथील देवाचेकातोर येथे बोरीच्या नवदुर्गा देवीच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या खाजण शेतात ही पूजा दरवर्षी होते. 24 शेतकरी ही खाजण शेती कसवतात. या पूजेत शेतकरी कुटुंबातील महिला सहभाग होत नाहीत.

 

… म्हणून करतात मगरीची पूजा
ङ्गमानगे थापणेफ हे परंपरागत एक देवकृत्य आहे. खाजण शेतात खाडीतील खारे पाणी आतबाहेर सोडण्यासाठी घालण्यात येणारा बांध हा अत्यंत महत्त्वाचा असतो. बांध फुटल्यास मगरीसारखे जीव फुटलेल्या बांधामागे शेतात येऊन पिकाची नासाडी करू शकतात. तसेच मगरीमुळे शेतकर्‍यांच्या जीवालाही हानी पोहोचू शकते. त्यासाठी मगरीला देवाचे स्थान देण्यात आले. बांधाच्या ठिकाणीच मगरीची प्रतिकृती स्थापन करून तिचे पूजन केले जाते व बांध तसेच शेतीचे रक्षण कर, असे मागणे मागितले जाते.

Reva Flora

मानगे थापणे मागची मिथक कथा
श्री रामभक्त हनुमान हे माता सीतेच्या शोधात लंकेला गेल्यावर रावण पुत्र मेघनाद हनुमानाला पकडून रावणाच्या दरबारात आणतो. तेव्हा रावण हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश देतो. त्यानंतर हनुमान जळत्या शेपटीने संपूर्ण लंका पेटवतो. आगीत जळलेल्या शेपटीमुळे हनुमानाला तीव्र वेदना होतात. वेदना शांत करण्यासाठी ते समुद्राजवळ पोहचतात. त्यावेळी हनुमानाच्या घामाचा एक थेंब काठावरच्या एका मगरीच्या मुखात पडतो. त्यातून मगर गर्भवती होते व मगरध्वजचा जन्म होतो. मगरध्वजाची शक्ती पाहून रावण त्याला पाताळलोकचा व्दारपाल नियुक्त करतो. खाजन शेती करणारेही मगरीला मगरध्वज मानून तिची पूजा करतात. ङ्गमानगे थापणेफ हा मगरध्वजाला दिलेला मान असल्याचे खाजण शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

खाजण शेती म्हणजे काय?
खाडीत व छोट्या आखातांत समुद्राचे खारे पाणी व भूखंडावरून येणारे गोडे पाणी यांची मिसळ होते. नद्यांनी व समुद्रप्रवाहांनी वाहून आणलेल्या गाळांचे अशा ठिकाणी छोट्या गोट्यांत रूपांतर होऊन त्यांचे निक्षेपण होते. हा नव्याने बनलेला भूभाग कालांतराने ओहोटीच्या वेळी उघडा पडू लागतो व खार्‍या पाण्यावर वाढणारे वनस्पतिप्रकार तेथे उगवू लागतात. त्यांच्या मुळांशी निक्षेपणाचे कार्य विशेष जलद होऊन भरतीच्या वेळीही जेमतेम उघडी पडेल इतकी या भूभागाची उंची वाढते. या भूभागास खाजण असे नाव आहे. विशिष्ट तर्‍हेचा बांध बांधून खाजणाचा शेतीस उपयोग करून घेतात. गोव्यात खाजणात भात शेती केली जाते. कोकणात मात्र मीठ तयार होते, त्या खाजण जमिनीला आगर म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिम कनारपट्टीलगत नद्यांच्या मुखाशी भरती-ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान खाड्यांची निर्मिती झाली आहे. या खाड्यांच्या दलदलयुक्त खाजण क्षेत्रात खारफुटीची बने खाजण वने आढळतात. या वनांना कांदळवन असेही संबोधतात.

Shree Sairam Plastic & Drip Irrigation

अशी तयार करतात मगरीची प्रतिकृती
खाजण शेती करणारे वर्षांत सहा वेळा खाजन शेतीच्या ठिकाणी पूजापाठ करतात. शेतीसाठी जमीन खणताना, मळणी, पेरणी, कापणी प्रत्येकवेळी नारळ वाढून स्थळदेवतेला अर्घ्य वाहिले जाते. चिकण मातीपासून मगराची प्रतिकृती घडवणारे यासाठी बरीच मेहनत घेतात. मगरीचे टोकदार दात, धारधार नखे, अंगावरची खवले आदींसाठी छोट्या काठ्या, शिंपले, अंड्यांचा उपयोग केला जातो.
– धनश्री मणेरीकर, पणजी

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • मशरूम शेती शेतकऱ्यांसाठी उद्योगाची नवी संधी!
  • पीएम-किसान योजनेच्या 6,000 पेन्शन लाभात कोणतीही वाढ नाही; तेलबियांमध्ये ‘आत्मनिर्भरता’ योजना पुन्हा सुरू

Share this:

  • Facebook
  • X
Tags: मगरीची पूजा
Previous Post

मशरूम शेती शेतकऱ्यांसाठी उद्योगाची नवी संधी!

Next Post

शेतकऱ्यांनो, पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी करताना काळजी घ्या… अन्यथा उद्भभवू शकते मोठे संकट!

Next Post
शेतकऱ्यांनो, पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी करताना काळजी घ्या

शेतकऱ्यांनो, पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी करताना काळजी घ्या... अन्यथा उद्भभवू शकते मोठे संकट!

ताज्या बातम्या

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.