प्रसिद्ध रानभाजी - कटुरले हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. या पिकाचा कालावधी 60 ते 70 दिवसांचा असून लागवडीच्या 15 ते 20 दिवसात यांची उगवण झालेली आपल्याला दिसते. याची बाजारातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

भारतामध्ये शतकानुशतके लागवड केली जाणारी रानभाजी म्हणून कटुरले, आघाडा, माथा- तांडूला, कुर्डू, पावटा या प्रसिद्ध आहे. यातील कटुरलेची लागवड उन्हाळ्यात व पावसाळ्यात केली जात असते.

कटुरले या रानभाजीचे विशेष गुणधर्म - कटुरले ही भाजी आपल्याला विविध प्रकारच्या रोगांपासून दूर ठेवण्यात सक्षम आहे. आयुर्वेदात या भाजीला अनन्यसाधारण महत्व आहे. 

या आजारांवर गुणकारी - डोकेदुखी, केसगळती, कानाचे विकार, खोकला, पोटदुखी, मूळव्याध, काविळ, डायबिटीज, लकवा, सर्पदंश, कॅन्सर आणि उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर स्वरुपाच्या आजारावर ही भाजी गुणकारी आहे. 

केवळ कटुरलेची भाजीच गुणकारी नसून त्याची फुल, पान आणि मुळांचा वापर करून औषधी ही तयार केल्या जातात.  

कटुरले ही रान भाजी कारल्याच्या वैशिष्ट्यांसारखीच असते. मात्र, या भाजीची चव कडू नसते. कटुरले च्या फळावर बारीक मुलायम काटे असतात. ही भाजी आकाराने गोल असते तर यात मुख्यत्वे दोन प्रकार पडतात एक म्हणजे लहान आकाराची भाजी तर दुसरी त्यामानाने थोडी मोठी असते. यात आकाराने लहान असलेल्या कटुरल्याची मागणी जास्त आहे.