मुंबई : देशभरासह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने (IMD 15 July 2024) रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच येत्या 18 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 20 जुलैला..
EXPORT WORKSHOP.. कृषी शेतमाल निर्यात कार्यशाळा..; अॅग्रोवर्ल्डतर्फे नाशकात 20 जुलैला…
राज्यात कालपासून पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत असून कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
IMD 15 July 2024 : कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट
रेड अलर्ट
रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट
पुणे, रायगड आणि सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
यलो अलर्ट
जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पालघर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- EXPORT WORKSHOP.. कृषी शेतमाल निर्यात कार्यशाळा..; अॅग्रोवर्ल्डतर्फे नाशकात 20 जुलैला…
- या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा