मुंबई : येत्या 4-5 दिवसात कोकण, विदर्भात मुसळधार सुरूच राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. (Heavy Rain in Vidarbha) यापुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र व पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतीजोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो.
निर्मल रायझामिका 👇
पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी आज, 24 जुलै रोजी बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले आहे. 24 जुलै रोजी बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होऊन त्याच्या प्रभावाखाली पुढील 24 तासांत त्याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
विदर्भाला पुन्हा पावसाचा फटका बसणार (Heavy Rain in Vidarbha)
बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे विदर्भात पुन्हा पावसाचा फटका बसू शकतो. विदर्भात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याचे हवामान विभागाचे अनुमान आहे. त्यामुळे येत्या 4 दिवसांसाठी विदर्भात “यलो अलर्ट” देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातील घाट परिसरातही या काळात जोरदार पावसाची शक्यता आहे.