इतर

केंद्राच्या योजनेतून राज्यात सेंद्रीय शेतीसाठी अवघ्या 2 कोटींचा निधी वितरित

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन 2023–24 या आर्थिक वर्षात राबविण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता केंद्र सरकारचा हिस्सा 1 कोटी 30 लाख रुपये व त्या अनुसरून राज्य सरकारचा हिस्स्याचा 86.67 लाख रुपये असा एकूण 2 कोटी 16 लाख 67 हजार रुपये इतका निधी कृषी आयुक्तालय पुणे यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

सन 2016–17 पासून राज्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना, ही गट शेती आधारित सेंद्रिय शेती योजना, केंद्राचा हिस्सा 50 टक्के व राज्याचा हिस्सा 40 टक्के या प्रमाणात राज्यात राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक सेंद्रिय शेतीस व सेंद्रिय निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने प्रमाणिकरण करणे, शेतकऱ्यांच्या शेतावार सेंद्रिय निविष्ठा तयार करणे, रासायनिक किटकनाशके उर्वरित अंशमुक्त शेतमाल ग्राहकास उपलब्ध करून देणे, सेंद्रिय शेती ग्राम विकसित करणे तसेच शेतीवर आधारित प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेणे, कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उत्पन्न वाढविणे याबाबीचा योजनेत समावेश आहे.

Planto Krushitantra

ही योजना गट आधारित असून 20 हेक्टर क्षेत्राचा एक गट याप्रमाणे गट स्थापन करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत एकदा निवड केलेल्या गट/लाभार्थीस तीन वर्षे लाभ देण्यात येतो. सन 2022- 23 पासून परंपरागत कृषी विकास योजनेकरीता राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

Panchaganga Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button