Home शासकीय योजना शेतकर्‍यांना वर्षाकाठी मिळणार एकरी 50 हजार ?

शेतकर्‍यांना वर्षाकाठी मिळणार एकरी 50 हजार ?

शेतकर्‍यां

मुंबई : राज्यभरातील शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा व्हावा, यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने नुकताच या योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात शेतकर्‍याने त्याची जमिन या योजनेसाठी भाडे तत्वावर दिल्यास त्याला त्या जागेच्या भाडेपोटी वर्षाकाठी एकरी 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहेत. या योजनेतून शेतकर्‍यांना उत्पन्न तर मिळणारच आहे, शिवाय विजेची समस्या देखील मार्गी लागणार आहे. चला तर मग जाणून घेवू या योजनेविषयी…

कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM

राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 किमीपर्यंतची सरकारी जमीन तर 5 किमीपर्यंतच्या खासगी जमिनीची महावितरणला गरज भासणार आहे. खासगी जमिनीसाठी शेतकर्‍यांना पूर्वी एकरी 30 हजार दिले जात होते. त्यात आता वाढ करून 50 हजार वार्षिक भाडे देण्यात येणार आहे. तसेच शासकीय जमीन देणार्‍या ग्रामपंचायतींनाही 15 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

Ellora Natural Seeds

या शेतजमिनींना प्राधान्य

सौर प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज दिवसा कृषिपंपांसाठी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा रात्री-अपरात्री सिंचनासाठी शेतात जाण्याचा त्रास वाचणार आहे. या योजनेत सहभागी होवून जमिन भाडे तत्वावर देवू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांना दरवर्षी 50 हजार प्रतिएकर भाडे देण्यात येणार आहे. यात दरवर्षी 3 टक्के वाढ देण्यात येणार आहे. याशिवाय शेतकर्‍यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी पूर्वी 10 हजार रुपये असलेले प्रक्रिया शुल्क आता केवळ 1 हजार करण्यात आले आहे. वीज उपकेंद्रापासून जवळ असणार्‍या जमिनीला या योजनेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

Jain Irrigation

या ठिकाणी करु शकतात अर्ज

योजनेत सहभागी होण्यासाठी तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही महावितरणच्या संकेतस्थळाला भेट देवू शकता किंवा नजिकच्या महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. याच ठिकाणी तुम्हाला अर्ज देखील करता येणार आहे. या योजनेतून शेतकर्‍यांना दुहेरी लाभ म्हणजेच उत्पन्न तर मिळणारच आहे शिवाय विजेची समस्या देखील दूर होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇