नवी दिल्ली : शेतमालाची विशेषत: फळपिकांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. बर्याचदा वाहतुक सुविधेअभावी शेतकर्यांना आपला माल कवडीमोल भावाने स्थानिक व्यापार्यांनाच विकावा लागतो. मात्र, शेतकर्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. कारण सरकारने शेतमालाच्या वाहतुकीसाठी एक योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना आपला शेतमाल थेट विमानाने निर्यात करता येणार आहे. हे वाचल्यानंतर तुमच्या डोक्यात ही योजना आहे नेमकी काय?… शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतो का?… कसा घेता येईल लाभ?… असे प्रश्न निर्माण झाले असतील ना…तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती वाचणे गरजेचे आहे. चला तर मग वाचूया सविस्तर.
शेतकरी अधिक समृध्द व्हावा, त्याला अधिकाधिक उत्पादन व्हावे, त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी सरकार नेहमी काही ना काही योजना राबवित असते. धान्यवर्गीय पिक वगळता शेतात पिकणारे सर्वच पिक… मग भाजीपाला असो की फळे ही सर्व नाशवंत असल्याने तोडणीनंतर या मालाला तातडीने विक्रीसाठी बाजारात पाठविणे गरजेचे असते. सरकार देत असलेल्या मदतीच्या हातामुळे तसेच शेतकरी देखील अत्याधुनिक व जागृत झाल्यामुळे तो आपला माल थेट परदेशातही निर्यात करु लागला आहे. परंतु, अनेक ठिकाणी आजही माल पाठविण्यासाठी हवी तशी सुविधा उपलब्ध नाही. मात्र, शेतमाल निर्यातीची शेतकर्यांची ही चिंता मिटणार आहे. कारण की सरकारने कृषी उडाण योजना हाती घेतली असून थेट विमानाने मालाची निर्यात करता येणार आहे.
कृषी उडान योजनेची सुरुवात करण्यासाठी केंद्र सरकारने 2020-21 च्या बजेटमध्येच याबाबत तरतुद केली होती. या कृषी उडान योजना – 2023 मध्ये शेतकर्यांना कृषी मालाच्या वाहतुकीसाठी मदत केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकर्यांना त्यांचा शेतमाल विशेष विमानांच्या सहाय्याने वेळेवर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणावर पाठविला जाणार आहे. यामुळे शेतकर्यांच्या शेतमालाला वेळेवर बाजारपेठ मिळून चांगला दर मिळू शकतो.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग आणि नागरिक उड्डान मंत्रालयाच्या मदतीने सुरू केली जात आहे. या योजने अंतर्गत केंद्र, राज्य सरकार आणि विमानतळ संचालक यांनी शिफारस केलेल्या निवडक एयरलाइन्सला वित्तीय प्रोत्साहन दिले जात आहे. या कृषी उडान योजना 2023 अंतर्गत दूध, मासे, मांस यासारख्या ख़राब होणार्या वस्तुंना हवाई वाहतुकीच्या माध्यमातून लवकरात लवकर बाजारांमध्ये पोहोचविले जाणार आहे.
योजनेचा मुख्य उद्देश
आपल्या देशातील बहुतांश नागरिक आजही शेतीच्या माध्यमातून आपला उदनिर्वाह करत आहेत. त्यामुळे सरकारने कमीत कमी वेळेत शेतकर्यांचा शेतमाल थेट बाजारात पोहचविणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू केली आहे. वेळेत बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेतकर्यांना योग्य दर मिळून शेतमालाची नासाडी होण्याची देखील चिंता मिटणार आहे.
या दिवशी झाली योजनेची सुरुवात
कृषी उडान योजनेची सुरुवात केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2020 ला केली होती. कृषी उड़ान योजने अंतर्गत शेतकर्यांना अनुदानावर आधारित विमान सेवा पुरविण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही मार्गावर सुरु केली जाणार आहे. या योजने अंतर्गत विमानातील अर्धी सिटे शेतकर्यांसाठी योग्य दरात उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. व्यवहारता फंडिंग या नावाने शेतकर्यांसाठी ठरल्याप्रमाणे पैसे उपलब्ध करुन दिले जातील। हे पैसे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून दिले जातील.
नोंदणी करणे गरजेचे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकर्यांना नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतील. या योजनेतंर्गत शेतकर्यांना कमीत कमी अर्धी सिटे योग्य दरात दिली जातील. योजनेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना सरकारने ठरविल्याप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार च्या माध्यमातून हा व्यवहारता फंड (VGF) वापरला जाईल.
अशी आहेत आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, शेतीशी संबंधित कागदपत्रे, रहिवासाचा दाखला, मोबाइल नंबर, रेशन कार्ड आदी कागदपत्रे लाभार्थ्यांकडे असणे गरजेचे आहे. भारतीय नागरिकच या योजनेचा लाभ घेवू शकतील तसेच या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकरी असणे गरजेचे आहे.
अशी करा नोंदणी
कृषि उड़ान योजनेत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला याचे अधिकृत संकेतस्थळ http://agriculture.gov.in वर जावून त्याच्या होम पेजवरील ऑनलाइन अर्जावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती जसे की, नाव, पत्ता, आधार नंबर अशी माहिती व्यवस्थित व पूर्ण भरावी. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे. अशा प्रकारे तुमचा या योजनेसाठी अर्ज भरला जाईल.