हॅपनिंग

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणार – अजित पवार

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) – धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी जो धान उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवारी) सभागृहात सरकारच्यावतीने दिले.

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील घोषणा केली.

 

.. यामुळे खऱ्या धान उत्पादकांनाच फायदा मिळणार
बाहेरच्या राज्यातील धान येऊन आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, त्यांचा फायदा व्हावा यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली होती, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यात पैसे मिळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जे खरे धान उत्पादक आहेत त्यांना पैसे मिळतील. त्यांच्या नावाखाली नको ती दुकानदारी चाललेली आहे ती फार मोठी आहे याचा विचार मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button