हॅपनिंग

कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द

मुंबई : मंत्रिमंडळाने मंगळवारच्या बैठकीत कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2009 मध्ये मंजूर झालेला आकृतीबंध तात्पुरता कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव तयार करण्यापूर्वी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदे, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रीत योजनांचा कार्यभार आणि भविष्यातील प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे.

या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाशिवाय इतर चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात धुळ्यातील क्रीडांगणाच्या जागेचे आरक्षणही बदलले गेले आहे. धुळे महानगरपालिका हद्दीतील मौजे देवपूर येथील सर्व्हे क्रमांक 103 वरील क्रीडांगण आणि बगीच्यासाठी असलेले आरक्षण रद्द करून हा भाग सार्वजनिक -निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DdDlQqkNXtR/

मुंबईसाठी दोन निर्णय

मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 या प्रकल्पांच्या एकात्मिक कार शेड डेपोसाठी जमीन देणाऱ्या मौजे मोघरपाडा येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मोघरपाडा येथील सर्व्हे क्रमांक 30 मधील शेतकऱ्यांना 22.5 टक्के आणि 12.5 टक्के विकसित भूखंड वाटप केले जाणार आहेत. याशिवाय, मुंबईतील खार पश्चिम येथील रामकृष्णनगर परिसरातील म्हाडाच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

राज्यात दुष्काळ; शनिवारपर्यंत पहिली अधिसूचना – मुख्यमंत्री

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button