• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जनावरांसाठी चारा पिके… भाग-३

Team Agroworld by Team Agroworld
April 6, 2021
in तांत्रिक
0
जनावरांसाठी चारा पिके… भाग-३
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

ज्वारीची लागवड चार्‍यासाठी केली जाते. ज्वारीचा मुख्य फायदा म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत ती सुप्तावस्थेत राहते आणि कडक अवर्षणानंतर अल्पावधीत वाढू शकते. वाढणारा शेंड्याचा कोंब काढल्याने पिकाची अवर्षणाला तोंड देण्याची क्षमता कमी होते. ज्वारीचे पीक बर्‍याच प्रकारच्या जमिनींवर येऊ शकते. जमिनीनुसार वेगवेगळ्या जाती लावल्या जातात. पाण्याचा निचरा चांगला होणे मात्र जरुरीचे असते.

ज्वारीची मुळे मातीत खोल जातात व खालच्या थरातून पाणी शोषून घेऊ शकतात. या पिकाला जमिनीत सोडिअम कार्बोनेटचे क्षार असले तरी चालते. खाट्या ठेवलेल्या काळ्या जमिनीत खत घालण्याची जरूर नसते. शिंबीवर्गीय पिकाबरोबर फेरपालट केला असता मातीतील अन्नद्रव्ये वाढतात. चारा व मुरघासासाठी बर्‍याच वेळा चवळीसार‘या शिंबीवर्गीय पिकाबरोबर लावतात. चार्‍यासाठी ज्वारी लावताना बी दाट पेरले जाते. त्यामुळे खोडे खूप उंच ( 15 फुटांपर्यंत) वाढतात. उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यावर चार्‍यासाठी ज्वारी लावतात. पीक फुलावर आल्यावर ताटे कापून ती ओली वैरण म्हणून किंवा मुरघास करून गुरांना खायला घालतात. फुलावर येण्यापूर्वी ताटे गुरांना खाऊ घातल्यास त्यातील धुरोन या विषारी पदार्थाुळे विषबाधा होऊ शकते. कडबा उन्हात वाळवल्याने अथवा ओल्या वैरणीचा मुरघास केल्याने अल्प प्रमाणातील धुरीनचे प्रमाण नाहीसे होते. बाजरी किंवा भातापेक्षा ज्वारीची ताटे अधिक सकस असतात. महाराष्ट्रात वैरणीसाठी खरिपात निळवा व उतावळी,रब्बीत दगडी व मालदांडी आणि उन्हाळ्यात हंडी व काळबोंडी या जाती लावतात. या सर्व जाती पेरल्यानंतर 60 ते 70 दिवसात फुलावर येतात. धान्य काढून घेतल्यानंतर राहिलेली ज्वारीची ताटे व नंतरची नवी फूट हिवाळ्यात गुरांना चांगला चारा पुरवते. जमिनीची सुपीकता व पावसाप्रमाणे ज्वारीच्या गोड जातीपासून 25000 ते 75000 कि. प्रती हेक्टरी हिरवा चारा मिळतो.

बाजरी

बाजरीला कोरडी हवा व कमी पाऊस लागतो. हलक्या जमिनीत व कमी पाण्यात हे पीक घेता येते. कमी पावसाच्या प्रदेशात जिथे ज्वारी, मका येऊ शकत नाही, तिथे बाजरी लावता येते. चार्‍यासाठी लागवड करावयाची असेल तर 500 मि.मी. पाऊस आवश्यक असतो. बाजरीचे पीक पुष्कळ प्रकारच्या जमिनींवर लावता येते. हे पीक अतिशय आम्लयुक्त जमिनीवर वाढते. पिकाची क्षार सहन करण्याची क्षमता चांगली आहे. सिंधमध्ये खार्‍या जमिनी सुधारण्यासाठी बाजरी लावतात. पाण्याचा निचरा चांगला होणार्‍या सुपीक जमिनीवर पिकाची उत्तम वाढ होते. उशिरा पक्व होणारी बाजरीची जात चांगली समजली जाते. कारण तिच्यावर पाला जास्त असतो. चार्‍यासाठी बियाणे दाटीने पेरतात. त्यामुळे तणे दबली जातात. हिरव्या चार्‍यासाठी 6 ते 7 आठवड्यांच्या अंतराने कापणी करता येते. पीक फुलोर्‍यावर आल्यावर कापणी करतात. यापासून हेक्टरी 25,000 ते 30,000 कि. ओली वैरण मिळते. बाजरीचा मुरघास करता येतो. फुले आल्यावर 3 आठवड्यांनी कापणी करून मुरघास करतात. चार्‍यासाठी बहुधा मोठ्या दाण्यांचे प्रकार लावतात. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने भरपूर उंच वाढणारा व वर्षातून दोन वेळा चार्‍याचे उत्पादन देऊन धान्यही मिळू शकेल, असा बाजरीचा र?कार विकसित केला आहे. चार्‍याचे पहिले उत्पादन पेरणीपासून अवघ्या 50 ते 55 दिवसांत हाती येते. त्यावेळी हेक्टरी 50-75 टन ओला चारा मिळतो. त्यानंतर 50 दिवसांनी ओल्या चार्‍यासाठी पुन्हा कापणी करता येते. हेक्टरी 30 ते 40 टन चारा मिळतो. ओल्या चार्‍यासाठी कापणी न केल्यास हेक्टरी 20-25 क्विंटल बाजरी व वैरण मिळते. पंजाब, गुजरात,तामिळनाडू, आंध‘ प्रदेश या राज्यांतून पावसाळी हंगामात चार्‍यासाठी बाजरी लावली जाते. जनावरे व कोंबड्यांचे खाद्य म्हणून बाजरीचा उपयोग करतात. बाजरीच्या दाण्यांध्ये 12.4% पाणी, 11.6% प्रथिने, 5% स्निग्ध पदार्थ, 67.1% कर्बोदके, 1.2 %तंतू आणि 2.7 % खनिजे असतात. गुजरातेत धान्य व हिरवी ताटे दुभत्या जनावरांना खाऊ घालतात. हिरव्या चार्‍यात प्रथिनांचे प्रमाण 11% असते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कर्बोदकेखनिजेज्वारीतंतूपाणीप्रथिनेबाजरीस्निग्ध पदार्थ
Previous Post

सेंद्रिय शेतीसाठी टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सचा टिकाऊ उपयोग..

Next Post

उत्तर – मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता

Next Post
उत्तर – मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता

उत्तर - मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish