हॅपनिंग

शेतात पाणी साचल्याने पिवळ्या पडलेल्या पिकांवर उपाय


मागील पंधरवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश भागात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली आहे. बर्‍याच भागात पाऊसमान जास्त झाल्याने शेतात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने जमीन घट्ट होते तसेच पिकांच्या मुळाना जमिनीतून अपटेक (जमिनीतून उपलब्ध खताचे/अन्नद्रव्ये सेवन ) घेणे शक्य होत नाही. परिणामी पिकांची वाढ खुंटते व मूळ अतिपाण्यामुळे कुजून पिवळी पडतात. बुरशी वाढते. हीच परिस्थिती जास्त दिवस राहिल्यास पिके हाताची जायचा धोका संभवतो. अश्या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी खालीलप्रमाणे प्रमाणे उपाययोजना केल्यास पिकांची होणारी संभाव्य हानी टाळल्या जाऊ शकते
उपाय

  1. शेतात उतरते चर खोदून साचलेले पाणी बाहेर काढणे.
  2. प्रती पंप (पाठीवरचा) कॉपर ऑक्सिक्लोराइट (CO2) 30 gm + बुरशीनाशक 30 gm +कॅल्शियम नायट्रेट 100 gm+ 98 % ह्यूमिक अँसिड 25ml एकत्रित करून आळवणी (ड्रेंचींग) करावी. तसेच फवारणी करायची असेल तर स्टीकर 10ml टाकून फवारणीसाठी वापरावे.
    कॅल्शियम नायट्रेटमुळे जमीन सैल होईल व वनस्पतींमधील कॅल्शियमची कमतरता कमी करते आणि पिकाच्या वाढीस व जोमास मदत करते. ह्यूमिक अँसिड पांढर्‍या मुळाच्या वाढीसाठी मदत करेल. परिणामी अपटेकचे (जमिनीतून उपलब्ध खताचे सेवन ) घेण्याचे प्रमाण वाढेल.

Related Articles

Back to top button