मार्केट यार्डात केरळ आंब्याची ’देवगड हापूस’ म्हणून विक्री
पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागतात परराज्यातून मार्केटयार्डातील फळ बाजारात आंब्याची आवक सुरू झाली आहे. मात्र विक्रेते इतर राज्यातून आलेला आंबा देवगड हापूस म्हणून अधिकच्या दराने विकत आहेत. त्यातून ग्राहकांची फसवणूक होत आहे. केरळ आंब्याची ’देवगड हापूस’ या नावाने विक्री केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने फळ बाजारातील तीन अडत्यांवर दंडात्मक कारवाई आहे.
🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..
पुणे व मुंबईसह इतर जिल्ह्यातही धोका..
बाजारात कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्याशिवाय कर्नाटकातूनही आंबा येतो. मात्र, दोन्ही आंब्याची चव आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक करतात. पेटीतील आंब्यांची अदलाबदल करून विक्री करतात. हंगामाच्या सुरवातीला असा प्रकार उघडकीस आल्यामुळे बाजार समिती प्रशासन सावध झाले आहे. पुणे व मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातही हा धोका कायम आहे.
देवगडच्या लेबलने विक्री..
कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या बाजार आवारात 3 व्यापार्यांनी केरळ आंबा हा देवगड आंबा या नावाने लेबल लाऊन विक्री करताना आढळल्याने हा केरळ आंबा बाजार समितीने जप्त केला आहे. ही कारवाई बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनाखाली फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, रोजंदारी कर्मचारी देवानंद खराडे आणि तोलणार यांनी केली.
अॅग्रोवर्ल्डच्या देवगड हापूसला पसंती का..??
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हापूस आंबा विक्री हा अॅग्रोवर्ल्डचा मूळ व्यवसाय नाही. अॅग्रोवर्ल्ड हे 7 वर्षांपासून कृषी विस्तार क्षेत्रातील विश्वसनीय नाव आहे. तेव्हा देवगडमधील हापूस उत्पादक व ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून अॅग्रोवर्ल्ड काम करीत आहे. बिगर कल्टार.. बिगर कार्बाइड.. व थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्राहकांच्या हातात म्हणजे Minimum Handling.. पेटी फोडण्याचा किंवा भेसळीचा प्रश्नच नाही.. तेव्हा अॅग्रोवर्ल्डच्या माध्यमातून देवगड हापूस म्हणजे देवगड हापूसच मिळणार.. याबाबतीत निश्चित रहा व आपण देवगड हापूसचा मनसोक्त आस्वाद घ्या.. ☺️
कारण…
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत.. अॅग्रोवर्ल्ड..! 🌱
जळगाव – 9130091621 / 9130091622
नाशिक – 9130091623 / 9175050138
पुणे – 9130091633
औरंगाबाद – 9175050178 / 9175050179
धुळे – शिरपूर – नंदुरबार – शहादा – 9130091625
चाळीसगाव – 9130091643
मला सिल्लोड किंवा भोकरदन शहरात देवगड हापुस आंबा
आनि ईंद्रायनी तांदुळ व सेलम हळद आपल्या तर्फे उपलब्ध होईल का