• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

चारा टंचाईवर कमी खर्चाचे निर्मिती तंत्र – मुरघास

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2022
in तांत्रिक
0
चारा टंचाईवर कमी खर्चाचे निर्मिती तंत्र – मुरघास
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आशुतोष चिंचोळकर, यवतमाळ
आपल्या देशात मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चाराटंचाई निर्माण होत आहे. दिवसेंदिवस वातावरणातील बदल लक्षात घेता, पशुपालकांनी जनावरांच्या संगोपनात बदल करणे गरजेचे झाले आहे. बदलत्या हवामानामुळे जनावरांना चारा न मिळाल्याने उपाशी राहण्याची परिस्थिती येऊ शकते. यावर उपाय म्हणून मुरघास या साठवण पद्धतीचा वापर केला पाहिजे. ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत हिरवा चारा योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीने आंबवून साठवल्यावर मुरघास तयार होतो.

अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून… 

खालील व्हिडिओ पहा..

https://fb.watch/cakdUNv3cy/

 

मुरघास (सायलेज)
पावसाळ्यात गवत, कडबा, मका यासारख्या पिकांच्या ओल्या वैरणींपैकी काही भाग पीक अथवा गवत फुलोर्‍यात असताना अगर दाणे भरण्याच्या स्थितीत कापून विशिष्ट पद्धतीने मुरवून टिकवितात त्याला मुरघास अथवा मुरलेली वैरण असे नाव आहे. जमिनीतील खड्ड्यात अगर जमिनीवरील उभ्या दंडगोलाकार कोठीत हवाबंद स्थितीत ओली वैरण ठेवल्यास त्यात अवायू किण्वनापासून (वातरहित आंबण्याच्या क्रियेपासून) उत्पन्न होणार्‍या आम्लांमुळे हिरव्या वैरणीतील पोषक द्रव्यांचे परिरक्षण होते. हिरवे गवत कापून वाळविल्यास त्यातील 20 ते 30 टक्के पोषक द्रव्ये नष्ट होतात परंतु त्याचा मुरघास केल्यास हे प्रमाण 10-15 टक्के एवढेच असते. काही भागात सतत पावसामुळे अथवा सूर्यप्रकाशाच्या अभावी हिरवे गवत वाळविता येत नाही. त्यावेळी मुरघास करण्याची पद्धत विशेष महत्त्वाची असते. अवायू किण्वनाची क्रिया सुरुवातीचे 2-3 महिने होते आणि त्यानंतर 12-18 महिने पर्यंत मुरघास कोणताही विशेष बदल न होता टिकून राहतो. ज्यावेळी ओली वैरण उपलब्ध नसते अशा वेळी मुरघासाचा उपयोग ओल्या वैरणीप्रमाणे करता येतो. मुरघास बनविल्यामुळे हिरव्या वैरणीतील पोषक घटकांचे जतन करता येते. हिरव्या वैरणीच्या टंचाईच्या काळात पर्याय म्हणून मुरघास उपलब्ध करून देता येतो.

मुरघासासाठी कोणकोणती पिके घ्यावीत
उत्तम प्रकारचा मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपिअर (हत्तीघास), मार्वेल (पन्हाळी गवत), उसाचे वाडे, ओट, इत्यादी एकदल वर्गीय चारा पिकांचा उपयोग करता येतो. कारण या पिकांमध्ये अंबविण्याच्या क्रियेसाठी लागणार्‍या साखरेचे प्रमाण जास्त असते.
मका हे पीक मुरघास करण्यासाठी सर्वांत चांगले समजले जाते. इतर कोणत्याही पिकापेक्षा मक्याच्या मुरघासातून जास्त पोषक द्रव्ये मिळतात. केवळ गवताचा मुरघास करण्याऐवजी लसूणघास, बरसीम, चवळी, ताग अशा शिंबावंत (शेंगा येणार्‍या) पिकांचे त्यात मिश्रण केल्यास मुरघासाचे पोषणमूल्य वाढते. गवतामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते व शिंबावंत पिकांत ते जास्त असते.

 

चारापीक कापणीची योग्य वेळ
* मका : पीक 50 टक्के फुलोर्‍यामध्ये असताना पेरणीनंतर 60 ते 70 दिवसांनी कापणी करावी. * ज्वारी : पीक 50 टक्के फुलोर्‍यामध्ये असताना पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी कापणी करावी. * बाजरी : पीक 50 टक्के फुलोन्यामध्ये असताना सर्वसाधारपणे पेरणीनंतर 45 ते 55 दिवसांनी कापणी करावी. * ओट : पेरणीनंतर 60 ते 70 दिवसांनी कापणी करावी. बहुवर्षीय वैरणपिके : संकरित हत्ती गवताच्या प्रजाती (यशवंत, जयवंत, गुणवंत, संपूर्ण इत्यादी), गिनी गवत सर्वसाधारण पहिली कापणी पेरणीनंतर 60 ते 70 दिवसांनी (10 आठवड्यांनी) व त्यानंतरच्या कापण्या प्रत्येकी 30 ते 40 दिवसांनी कराव्यात.

मुरघास बनविण्याची प्रक्रिया
चारापिके त्यांच्या चिकाच्या किंवा फुलोर्‍याच्या अवस्थेत आली की कापावीत. मुरघास बनविताना चारा पिकातील पाण्याचे प्रमाण 60 ते 65 टक्के असावे. त्यापेक्षा जास्त पाणी झाल्यास नुकसान होऊ नये म्हणून पीक कापणी नंतर थोड्यावेळ साठी चारा सुकू द्यावा. त्यानंतर कुट्टी मशीन च्या साह्याने चार्‍याचे एक – दोन इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून ना ठेवता त्वरित बॅगेत, खड्डयात आणून टाकावी. कुट्टी टाकल्यानंतर ती पसरवावी. धुमश्याने किंवा पायाने अथवा ट्रॅक्टरने तुडवावी. यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाते. व कुट्टी दाबून बसते. कडांवरची कुट्टी विशेषतः चांगली दाबून घ्यावी. साधारण दोन महिन्यांनी चांगला, स्वादिस्ट,रुचकर असा पौष्टिक मुरघास तयार होतो.

 

मुरघास बनविण्याच्या पद्धती
(1) खड्डा पद्धत (2) पिशवी पद्धत (3) टाकी पद्धत
मुरघास बनविण्याची पद्धत तिन्हींमध्ये सारखीच आहे. सिमेंटची खोली/पिंप/प्लॅस्टिक पिशवी/प्लॅस्टिकची पाण्याची टाकी यांमध्ये मुरघास हवाबंद स्थितीत ठेवता येतो.
खड्डा पद्धत: खड्डा हा आवश्यतेनुसार खोदावा. उदा. 1 चौ.फूट जागेत 14 ते 15 किलो गवत बसते. मोठ्या जनावरांसाठी 18 ते 20 किलो चारा लागतो. खड्याच्या कडा गोल असाव्यात. त्या आयताकृती असू नयेत. त्यामध्ये प्लॅस्टिक अंथरावे. त्यामुळे जमिनीचा ओलावा चार्‍यात जाणार नाही. प्लॅस्टिकची टाकी असल्यास प्लॅस्टिक अंथरण्याची गरज नाही. बारीक केलेला चारा समांतर पद्धतीने सायलोमध्ये भरणे सुरू करून साधारणत: 3 ते 4 इंच व जास्तीत जास्त 1 फुटाचा थर बनवावा. सायलोमध्ये हवा राहू नये म्हणून चारा पसरल्यावर तो दाबून घ्यावा. 100 किलो वैरणीला 5 ते 6 किलो मळी किंवा गूळ बारीक करून (पावडरसारखा) समप्रमाणात विभागून व प्रत्येक थरानंतर म्हणजे सायलो भरेपर्यंत टाकत राहावे. त्याचबरोबर 6 ते 7 किलो साधे मीठ टाकावे. सायलोमध्ये/खड्यामध्ये चारा भरताना खड्याच्यावर साधारणतः एक फुटापर्यंत भरावा. नंतर त्यावर वाळलेल्या गवताचा एक थर पसरावा. प्लॅस्टिकने झाकून त्यावर मातीचा थर टाकून सायलो/खड्डा हवाबंद करावा. प्लॅस्टिक टाकी वापरलेली असल्यास झाकण लावल्यावर वरून प्लॅस्टिकने झाकून घ्यावे. खड्डा वापरत असल्यास शक्यतो उथळ जागी करावा.

मुरघास चांगला बनण्यासाठी आवश्यक बाबी
(1) वैरणीचे पीक योग्य वेळी कापले गेले पाहिजे. (2) कापलेल्या पिकात आर्द्रतेचे प्रमाण 65 ते 75% पर्यंतच असावे व त्यात कार्बोहायड्रेटांचे प्रमाण पुष्कळ असावे. (3) वैरणीचे लहान तुकडे कोठीत अगर खड्ड्यात भरून ते शक्य तेवढे दाबून घेणे ही फार महत्त्वाची बाब आहे. वरील सर्व बाबी योग्य प्रमाणात असल्यास अवायू किण्वनांमुळे लॅक्टिक अम्ल तयार होऊन उत्तम प्रतीचा मुरघास तयार होतो परंतु या बाबींच्या असंतुलनामुळे ब्युटिरिक अम्लाची उत्पती होते आणि त्याच्या अप्रिय वासामुळे जनावरे मुरघास खात नाहीत.


मुरघास तयार होताना घडणारी रासायनिक प्रक्रिया
मुरघास करण्यासाठी भरलेल्या हिरव्या चार्‍यात जे रासायनिक बदल घडतात, त्यामुळे हिरवा चारा खराब न होता साठवला जातो. मुरघासाचा खड्डा चान्याने भरून, चांगला दाबून पूर्णपणे हवाबंद केल्यानंतर हिरव्या चार्‍यातील वनस्पतीपेशींचा श्वासोच्छ्वास काही काळ चालू असतो. त्यासाठी चार्‍याच्या थरामध्ये अडकलेला ऑक्सिजन वनस्पतीपेशी वापरतात. चार्‍यात असणार्‍या साखरेचे ज्वलन होऊन कार्बन डाय-ऑक्साईड, पाणी आणि उष्णता तयार होते. काही तासांमध्ये आतील शिल्लक राहिलेला ऑक्सिजन संपून जातो व पूर्णपणे ऑक्सिजनविरहित वातावरण खडयात तयार होते. काही तासांमध्ये आतील शिल्लक राहिलेला ऑक्सिजन संपून जातो व पूर्णपणे ऑक्सिजनविरहित वातावरण खड्यात तयार होते. या सर्व प्रक्रियेमुळे प्रथम आम्ल तयार करणार्‍या जिवाणूंची संख्या वाढून चार्‍यातील साखरेचे लक्टिक अ‍ॅसिड आणि व्होलाटाइल फॅटी अ‍ॅसिडमध्ये (असिटिक, प्रोपिओनिक आणि ब्युट्रिक अ‍ॅसिड) रूपांतर होते. या सर्वांमध्ये असिटिक अ‍ॅसिडचे प्रमाण सर्वात जास्त, तर ब्युट्रिक अ‍ॅसिडचे प्रमाण सर्वांत कमी असते. तयार झालेली अम्ले चारा खराब करणार्‍या अनावश्यक जिवाणूंची वाढ थांबवतात.

हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..

चांगला मुरघास कसा ओळखावा
* चांगला तयार झालेला मुरघास हा चमकदार, हिरवट – पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचा असतो. * 4 ते 6 आठवड्यांनंतर खड्डा/बॅग एका बाजूने उघडून आवश्यक मुरघास काढून घेऊन खड्डा/बॅग व्यवस्थित झाकावा. * दररोज कमीत कमी अर्धा ते 1 फूट जाडीचा थर काढून घ्यावा. काढलेल्या मुरघासाचा वास जाण्यासाठी थोडावेळ उघडा ठेवावा. त्यानंतर जनावरांना खाण्यास द्यावा. * गाई-म्हशींना जास्तीत जास्त 15 ते 20 किलो, तर शेळ्या-मेंढ्यांना 1 ते 1.5 किलोपर्यंत मुरघास द्यावा. सुरवातीला जास्त न देता हळू-हळू प्रमाण वाढवत जावे. * बुरशीयुक्त व खराब मुरघास जनावरांना खाऊ घालू नये. * दूध काढताना मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.

मुरघासचे फायदे
* मुरघास हा जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे. * वर्षभर एकाच प्रतीचा व अधिक पौष्टिकतेचा चारा मिळाल्याने जनावरे भरपूर दूध देतात. वेळेवर माजावर येऊन गाभण राहण्यास मदत होते. * मुरघासात तयार होणारे लॅक्टिक आम्ल हे गायी म्हशींच्या पचनेंद्रियात तयार होणार्‍या रसासारखे असते. म्हणून मुरघास पचण्यास सोपा असतो. * मुरघासामुळे जनावराची भूक वाढते व ते मुरघास जास्त खातात. वाया घालवीत नाहीत. कारण तो रुचकर, स्वादिष्ट व सोम्य रेचक असतो. * वाळलेल्या चार्‍याच्या पौष्टेकतेच्या तुलनेत मुरघासाची पौष्टिकता उत्तम असते. * मुरघासाकरिता चारा पिकाची कापणी फुलोरा अवस्थेत केली जात असल्यामुळे जास्तीत जास्त अन्नदव्ये चार्‍यामध्ये येतात. * मुरघासाला वाळलेल्या चार्‍यापेक्षा कमी जागा लागते म्हणजे एका घनमीटर जागेत 66 किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर मुरघासाच्या स्वरूपात 500 किलो हिरवा चारा ठेवता येतो. * कालवडी / रेड्यांची चांगली वाढ होऊन, त्यांच्यापासून भरपूर दुग्धोत्पादन देणार्‍या गाई-म्हशी तयार होतात. * पावसाळ्यात कमी खर्चात तयार होणारा अतिरिक्त हिरवा चारा त्याच्या पौष्टिकतेसह 1 ते 1.5 वर्षे साठवता येतो. * दररोज हिरवा चारा जनावरांना कापून घालण्यापेक्षा त्याचा मुरघास बनविल्यास चारा पिकाखाली असलेली जमीन लवकर रिकामी होऊन दुसरे पिक त्वरित घेता येते. म्हणजेच आपणाला जास्त पिके घेता येतात. * मुरघास बंधिस्त जागेत असल्याने त्यास आगीचा धोका नाही. तसेच तो जास्त दिवस टिकून ठेवता येतो व हिरवा चारा नसेल अशा टंचाईच्या काळात मुरघास वापरता येतो.

प्रा. स्नेहल प्र लोखंडे
पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग,
मारोतराव वादाफळे कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर, यवतमाळ.
मो. नं.- 9404240430

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कापणीचारा टंचाईचारापीकनिर्मिती तंत्रपद्धतीप्रक्रियामुरघासमुरघासचे फायदेरासायनिक प्रक्रियाशास्त्रशुद्धसायलेजहिरवा चारा
Previous Post

दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी.. म्हशीच्या दूध दरात वाढ..

Next Post

जनावरांना पचनाचे होणारे महत्त्वाचे आजार आणि उपचार

Next Post
जनावरांना पचनाचे होणारे महत्त्वाचे आजार आणि उपचार

जनावरांना पचनाचे होणारे महत्त्वाचे आजार आणि उपचार

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.