इतर

🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..

देवगडच्या नावाखाली देवगडच देणार.. तोही बिगर कल्टार.. बिगर कार्बाइड..

यंदा जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, औरंगाबाद शहरातही उपलब्ध होणार..

अशी झाली देवगड हापूस विक्रीची सुरुवात…

देवगड हापूस आंबा विक्री हा अ‍ॅग्रोवर्ल्डचा मूळ व्यवसाय नाहीच मुळी.. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाल्याने कोकणातील आंबादेखील झाडावरच पिकून गळून पडू लागला.. अशा विपरीत स्थितीत कृषी विभागाच्या पुढाकाराने देवगडच्या आंबा उत्पादकांना हात देण्याची जबाबदारी अ‍ॅग्रोवर्ल्डवरही आली.. आणि देवगड हापूस व अ‍ॅग्रोवर्ल्ड हे समीकरण गेल्या दोन वर्षांत घट्ट झाले.. अधिक वृद्धिंगत झाले..

 अ‍ॅग्रोवर्ल्ड टीमचा मुक्काम देवगड..!

आताही अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम देवगडमध्ये तब्बल दोन / अडीच महिन्यांच्या मुक्कामासाठी निघाली आहे.. यासाठी स्वतंत्र टीम उभी केली असून ते थेट शेतकऱ्यांच्या शेतावर थांबून स्वतःच्या देखरेखीखाली आंबे तोडणी ते पेटीत भरून पाठवण्याच्या प्रत्येक प्रक्रियेत जातीने लक्ष देतील.. यामुळे आपणास देवगडच्या नावाखाली देवगडचाच हापूस मिळणार..

 

अ‍ॅग्रोवर्ल्डचे धोरण..

अ‍ॅग्रोवर्ल्डचे पूर्वीपासूनच धोरण होते.. जे करायचे ते अव्वलच व जे द्यायचे तेही अव्वलच.. त्यात मग कोणतीही तडजोड नाही.. याच भूमिकेतून देवगडचा हापूस थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून ग्राहकांच्या हाती देतांना तो अस्सल देवगडच असावा.. त्यातही बिगर कल्टार.. व बिगर कार्बाइडचा असण्यावर भर दिला.. यासाठी थेट कोकणात जाऊन असे शेतकरी शोधले, पारखले व मगच त्यांच्याशी व्यवहार वाढवला..

 

अ‍ॅग्रोवर्ल्ड.. कृषी क्षेत्रातील विश्वासू नाव..

अ‍ॅग्रोवर्ल्ड हे गेल्या 7 वर्षांपासून कृषी विस्तार क्षेत्रात काम करत असून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी विश्वासू नाव बनले आहे.. यातून शेतकरी व ग्राहक यांच्यातील विश्वासू दुवा म्हणूनही 2 वर्षांपासून काम करण्याची जबाबदारीही अ‍ॅग्रोवर्ल्डने उचलली आहे.. त्याचाच परिपाक म्हणून अस्सल देवगड हापूस, महाबीजचाच इंद्रायणी व तोही सिंगल पॉलीश व 4 / 4.5% कुरकुमीन असलेली आरोग्यवर्धक सेलम हळद या क्षेत्रातही अ‍ॅग्रोवर्ल्डने भरारी घेतली आहे.. हे क्षितिज अजून विस्तारत आहे..

आम्ही जे देतो, जे देऊ ते अस्सल व खात्रीशीरच असणार याबद्दल आपण निश्चित रहा.. कारण…

आम्ही जाणतो नाती.. 

आम्ही जपतो विश्वास..

आम्ही आहोत.. अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱☺️

 

जळगाव – 9130091621 / 9130091622

नाशिक – 9130091623 / 9175050138

पुणे – 9175050176 / 9130091633

औरंगाबाद – 9175050178 / 9175050179

धुळे – शिरपूर – नंदुरबार – शहादा – 9130091625

चाळीसगाव – 9130091643

Related Articles

Back to top button