• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

निशिगंध लागवड तंत्रज्ञान

Team Agroworld by Team Agroworld
February 23, 2021
in तांत्रिक
0
निशिगंध लागवड तंत्रज्ञान
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

      निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून, त्याची लागवड महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे करता येते व हे पिक राज्यात उत्कृष्ट रित्या उत्पादन देते. निशिगंधाची फुले हारामध्ये वापरली जातात. शिवाय विविध प्रकारच्या पुष्परचनेमध्ये देखील या फुलांचे वेगळे स्थान आहे. यामध्ये सिंगल व डबल याप्रमाणे फुलांतील पाकळ्यांच्या रचनेप्रमाणे प्रकार पडतात. सिंगल प्रकारच्या निशिगंधाची फुले अधिक जास्त सुवासिक असतात व त्यांचा वापर हारांमध्ये व गजऱ्यांमध्ये केला जातो. डबल प्रकारच्या निशिगंधाच्या फुलदांड्याचा वापर पुष्परचनेमध्ये व बुकेमध्ये केला जातो. या फुलांचा वापर सुगंधी द्रव्ये निर्माण करण्यासाठी देखील केला जातो.

जमीन व हवामान

निशिगंधाची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार जमीन चांगली मानवते. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत कंद सडतात व झाड मरते. त्यामुळे दलदलीची व निचरा न होणारी जमीन या पिकासाठी निवडू नये.

अभिवृद्धीचा प्रकार

निशिगंधाची लागवड कंदापासून करतात. एका कंदापासून दुसऱ्यावर्षी ५ ते ६ कंद विकसित होतात. त्यातील प्रत्येक कंद मुख्य कंदापासून विलग (वेगळा) करून त्याची लागवड करतात. निशिगंधाची लागवड एप्रिल, मे किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात करावी.

लागवड:-

निशिगंधाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफ्यामुळे किंवा सरी-वरंब्यावर केली जाते. हलकी ते मध्यम व उत्तम निचऱ्याची असेल तर ३ मी. X २ मी. आकारमानाच्या सपाट वाफ्यात ३० X २० सें.मी. अंतरावर ४ ते ५ सें.मी. खोल लागवड केली जाते. जमीन जर काही कसदार असेल तर ४५ X ३० सें.मी. अंतरावर वरंब्याच्या मध्यभागी ५ ते ६ सें.मी. खोल कंदाची लागवड केली जाते. निशिगंधाचे हेक्टरी १ लाख ते १.५ लाख कंद लागतात. लागवड पूर्ण झाल्यावर ताबडतोब पाणी द्यावे.

लागवड पूर्व तयारी

ज्या ठिकाणी निशिगंधाची लागवड करावयाची आहे ती जमीन मार्च एप्रिल महिन्यात खोल नांगरावी. त्यानंतर दोन ते तीन वेळा फणणी करून धसकटे, हरळीच्या कशा वेचाव्यात व जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे व हेक्टरी ७५ किलो नत्र, ३०० किलो स्फुरद, व ३०० किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीत मिसळून द्यावे. वरील सर्व सेंद्रिय व रासायनिक खते जमिनीत चांगले मिसळून घ्यावीत व नंतर जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफे अथवा सऱ्या पाडून रान बांधणी करावी.

खते

लागवडीनंतर ४५ दिवसांनी हेक्टरी ६५ किलो नत्र व ९० दिवसांनी ६० किलो नत्र द्यावे. निशिगंधास प्रति वर्षी २०० किलो नत्र, ३०० किलो स्फुरद व ३०० किलो पालाश याप्रमाणे खते आवश्यक आहेत.

पाणी

निशिगंधाच्या पिकास हंगामनिहाय व जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांनी पानाच्या पाळ्या द्याव्यात. निशिगंधास तुषार सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केल्यास उत्पादनास चांगली वाढ होऊ शकते.

आंतरमशागत:-

निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्याने वेळचे वेळी गवताची खुरपणी करून लागवडीचे क्षेत्र स्वच्छ व भुसभुशीत ठेवणे आवश्यक आहे. सरी वरंब्यावरील लागवडीमध्ये जर वारंवार पाणी दिल्याने कंद उघडे पडू लागले तर दर ३ महिन्यांनी पिकाची खांदणी करून मातीचा भर देणे आवश्यक आहे. प्रत्येक खांदणीच्या वेळी खते दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

जाती

डबल :- सुहासिनी   सिंगल :- शृंगार   सिंगल :- रजत, रेखा   व्हेरीगेटेड :- सुवर्ण रेखा

पीक संरक्षण

निशिगंधास मावा, फुलकिडे व अळी या किडींचा व फुलदांड्याची कुज व पानांवरील ठिपक्या रोगांचा मुख्यत्वेकरुन पावसाळी प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी पुढीलप्रमाणे कोणत्याही एका कीटकनाशकाची / बुरशीनाशकाची फवारणी करावी.

अ. क्र. कीटकनाशक / बुरशीनाशक पाण्यातील प्रमाण प्रती १० लिटर किडी / रोग
१. मोनोक्रोटोफॉस ३६% प्रवाही
फॉस्फोमिडॉन ८५% प्रवाही
डायमेथोएट ३०% प्रवाही
१५ मिली
१० मिली
१० मिली
मावा व फुलकिडे
२. एन्डोसल्फान ३५% प्रवाही २० मिली अळी
३. डायथेन एम-४५
कार्बनडेझिम ५०%
पाण्यात विरघळणारी पावडर
२० ग्रॅम
२० ग्रॅम
फुल- दांड्यातील
कुज व पानावरील ठिपके

प्रत्येक फवारणीमध्ये ५ मिली / १० लिटर पाणी याप्रमाणे स्टिकर्स मिसळावे म्हणजे किडी व रोगांचे चांगले नियंत्रण मिळते.

उत्पादन:-

निशिगंधापासून प्रति हेक्टर प्रतिवर्ष ५० क्विन्तल (५ मी. टन) सुटी फुले अथवा सुमारे २.५ लाख फुलदांडे याप्रमाणे उत्पादन मिळते.

हे लक्षात ठेवा

  • कंदाची लागवड हलक्या जमिनीत १५ ते १७.५ से. मी. व भारी जमिनीत १० ते १२ से. मी. खोल करावी.
  • लागवडीनंतर ४५ ते ९० दिवसांनी नत्र युक्त खते दिल्यास झाडांची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते.
  • कंदाची उगवण सुरु असताना जास्त पाणी देणे टाळावे.
    सौजन्य:- कृषी विभाग महाराष्ट्र शासन 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: एन्डोसल्फानडायथेनडायमेथोएटनिशिगंधफुलकिडे व अळीफॉस्फोमिडॉनमावामोनोक्रोटोफॉस
Previous Post

या कारणांमुळे वापरतात तांब्याचे ब्रेसलेट

Next Post

सहकारातून समृद्धीकडे…!

Next Post
सहकारातून समृद्धीकडे…!

सहकारातून समृद्धीकडे...!

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish