• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

नाशिक, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा अलर्ट

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
in हवामान अंदाज
0
मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई: केरळमध्ये गुरुवारी हजेरी लावल्यानंतर नैऋत्य मान्सूनने आपला उत्तरेकडील प्रवास वेगाने करत दुसऱ्याच दिवशी, शुक्रवारी गोवा किनारी धडक मारली. गोव्यात मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयएमडी) कडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सध्या महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन पोहोचला असून राज्यासाठी हवामान स्थिती अत्यंत अनुकूल बनली आहे. १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.

शुक्रवारी दुपारी मान्सूनने अरबी समुद्रासह गोव्याच्या आणखी काही भागांमध्ये यशस्वी प्रवेश केला आहे. सॅटेलाईट स्थितीनुसार, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर सध्या दाट ढगांची दाटी पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती उत्तम आहे. तळकोकणात, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार?

मान्सून १० जूनपर्यंत तळकोकणात दाखल होणार असला, तरी त्यानंतर त्याचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व अलर्ट जारी

अरबी समुद्रातून येणारे पश्चिमेकडील वारे सक्रिय झाल्यामुळे राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

  • कोकण आणि गोवा: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि डहाणू परिसरात आज ६ जून रोजी येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • पश्चिम महाराष्ट्र: कोल्हापूर (घाट भागासह), सातारा (घाट भागासह), पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर.
  • मराठवाडा आणि इतर: बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि नांदेड.

मुंबईत आर्द्रता वाढण्याचा अंदाज

मुंबईत सध्या संमिश्र वातावरण असून काही भागांत ढगाळ हवामान तर काही ठिकाणी कडक ऊन पडत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढला आहे. शनिवारी, ६ जून रोजी मुंबई व आसपासच्या परिसरात पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये!

यंदा देशात मान्सूनचे आगमन थोडे विलंबाने झाले आहे. कोकणात १० जून तर उर्वरित महाराष्ट्रात २० जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय अधिकृत पेरण्या सुरू करू नयेत, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट टाळता येईल.

गेल्या वर्षीची (२०२५) स्थिती

गेल्या वर्षी २४ मे रोजी केरळमध्ये आलेला मान्सून अत्यंत वेगाने म्हणजेच २५ मे रोजीच तळकोकणात आणि २६ मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. यंदा मात्र तो संथ आणि नियमित गतीने पुढे सरकण्याचा अंदाज आहे.

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल

  • महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी
  • गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आयएमडीनैऋत्यमान्सून
Previous Post

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

Next Post

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

Next Post
जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

ताज्या बातम्या

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish