• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कोकणात अतिवृष्टी तर मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता – हवामान विभाग

कसे असेल  21 ते 27 सप्टेंबर पर्यंत हवामान

Team Agroworld by Team Agroworld
September 21, 2020
in तांत्रिक
0
कोकणात अतिवृष्टी तर मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता – हवामान विभाग
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/पुणे
मागील २४ तासात राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. या संततधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील जलप्रकल्प ओसंडून वाहत आहेत. दरम्यान हवामान खात्याच्या नवीन अंदाजाने पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आज (दि.२१ सप्टेंबर) मराठावाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात कडकडाट वादळी पाऊस पडेल. तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापुरात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. बुधवारपासून या भागात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. बुधवार (दि.२३) पासून पाऊस काही भागात थोडी उसंत घेणार .


मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही भागातही मुसळधार पाऊस होईल. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार असून खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. दम्यान आज मराठवाड्यात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. लातूर, बीड जिल्ह्यांत काही प्रमाणात पाऊस होईल. तर मंगळवारी औरंगाबाद वगळता इतर भागात ढगाळ हवामान राहिल. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल.

कसे असेल  21 ते 27 सप्टेंबर पर्यंत हवामान
मान्सून 2020 हा महाराष्ट्राला जास्त अनुकूल आहे. बर्‍याच भागात ५ दिवसांपासून व्यापक पाऊस सुरू आहे. या आठवड्यातही विदर्भ ते मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण, गोवा प्रदेशात 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यातही 21 आणि 22 रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर, पुणे, रायगड याचा प्रामुख्याने परिणाम होऊ शकतो.

23 आणि 24 रोजी संपूर्ण राज्यात पावसाची तीव्रता कमी होईल. तथापि, या काळात मराठवाड्यातून कोकण गोव्यापर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ आणि २६ सप्टेंबर रोजी दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल. परंतु यावेळी मर्यादित भागात पाऊस पडेल. त्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कमी होईल.

2020 हंगामात आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. कोकणात गोव्यात 25% जास्त पाऊस झाला, मध्य महाराष्ट्रात नेहमीपेक्षा 32% जास्त, मराठवाड्यात 28% जास्त पाऊस झाला. तर विदर्भात सामान्यपेक्षा 11% कमी पाऊस झाला आहे.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी   
नदी नाल्यांना पूर आल्याने पिकांसह शेतजमिन खरडून गेल्या आहेत. सोयबीनला अति पावसाचा फटका बसू शकतो, तर अनेक ठिकाणी कपाशी पीक पाण्याखाली गेले. द्राक्षबागांमध्ये पाणी साचून काही ठिकाणी ऊस आडवा झाला. मराठावाड्यातील औरंगाबाद जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे करपरा, दुधना , इंद्रायणी, पूर्णा, नद्यांना पूर आला. जळगाव जिल्ह्यातील गिरणा प्रकल्प प्रथमच सलग दुसऱ्या वर्षी १००% भरला आहे. नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, बाजरी, मका, या पिकांना फटका बसला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी शेताचे बांध ओलांडून पाणी वाहिले. शेतकऱ्यांनी शेतात साचलेले पाणी बाहेर काढून वापसा तयार करावा जेणेकरून उभ्या पिकांचे नुकसान होणार नाही. काढणीयोग्य शेतमाल झाकून काढणीच्या योग्य वेळेची प्रतीक्षा करावी. पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवावे. अश्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अतिवृष्टीगिरणामराठावाडा
Previous Post

कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अनुदानासाठी अर्ज स्वीकारणे सरू

Next Post

हरभरा लागवड तंत्रज्ञान

Next Post
हरभरा लागवड तंत्रज्ञान

हरभरा लागवड तंत्रज्ञान

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish