• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांचे 1 लाख 60 हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ

बीड मधील किसान क्रेडीट कार्ड डिजीटायझेशन – जनसमर्थ प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 16, 2024
in हॅपनिंग
0
मुद्रांक शुल्क
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : शेतकऱ्यांच्या एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मंत्रालयातील कार्यालयातून केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. डिजीटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजीटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

 

एका क्लिकने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली. किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटायझेशनच्या या जनसमर्थ प्रकल्पासाठी देशातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. बीड जिल्ह्यातील महसूल, कृषि अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या काही दिवसांत 4 लाख 75 हजार शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचे फार्मर्स आयडी तयार केले आहेत. याकरिता दोन ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे. “ॲग्रीस्टॅक- सीपीएमयू” यांच्याकडून या प्रकल्पाचे कार्यान्वयन केले जात आहे.

 

शेतकऱ्याना दीड वर्षात 45 हजार कोटींची मदत

मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे आहे. हे सरकार बळीराजाचे आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटात आपण त्यांना भरभरून मदत केली आहे. आपला देश कृषि प्रधान आहे. आपण शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानूनच सर्व योजनांचे नियोजन करतो आहोत. शेतकऱ्याना गेल्या दीड वर्षात 45 हजार कोटींची मदत आपण केली आहे. सिंचनांचे 120 प्रकल्प मार्गी लावले आहेत. यामुळे राज्यातील 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेती, माती आणि शेतकरी यांच्याशी आपली नाळ जोडलेली आहे, असे सांगून श्री. शिंदे यांनी राज्य सरकार राबवत असलेल्या एक रुपयात पीक विमा, जलयुक्त शिवार अशा योजनांचीही माहिती दिली.

डिजीटल क्रांतिचा शेती, शेतकऱ्यांसाठी वापर

मुख्यमंत्री म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषि क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळेच डिजीटल क्रांतिचा वापर शेतकऱ्यांसाठी आणि कृषि क्षेत्रासाठी करण्याचा हा त्यांच्या संकल्पनेतील प्रकल्प देखील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणणारा ठरेल. शेतकरी, बळीराजा हा अन्नदाता, मायबाप आहे. आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.

 

देशातील सहा जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प

शेतकऱ्यांच्या कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या शिंदे यांच्या घोषणेचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वागत केले. या निर्णयाचा पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चित मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री मुंडे म्हणाले की, देशातील सहा जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला. त्यामध्ये बीड आणि उत्तर प्रदेशातील फरुखाबाद या जिल्ह्यांनीच याची यशस्वी कार्यवाही केली. बीड जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी अहोरात्र राबून सुमारे 1 हजार 251 गावांतील शेतकऱ्यांचा डाटा एकत्र केला. यातून सुमारे 4 लाख 75 हजार शेतकऱ्यांचे फार्मर्स आयडी तयार करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्याची निवड ही आपल्या राज्यासाठी अभिमानास्पद आहे. तसेच राज्यातील कृषि क्षेत्रातील विकासाला चालना देणारी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक तसेच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले.

या कार्यक्रमास राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार संजय रायमुलकर, कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार, कृषि आय़ुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी प्रास्ताविक केले तसेच आभार मानले.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कांद्याला आज काय भाव मिळाला ? ; वाचा आजचे कांदा बाजारभाव
  • आजचे केळी बाजारभाव ; वाचा केळीला कुठे मिळाला सर्वाधिक भाव

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: किसान क्रेडीट कार्डमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुद्रांक शुल्क
Previous Post

कांद्याला आज काय भाव मिळाला ? ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Next Post

कापसाला या बाजार समित्यांमध्ये असा मिळाला भाव

Next Post
कापसाला या बाजार समित्यांमध्ये असा मिळाला भाव

कापसाला या बाजार समित्यांमध्ये असा मिळाला भाव

ताज्या बातम्या

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish