Home बाजार भाव आजचे केळी बाजारभाव ; येथे मिळाला सर्वाधिक दर

आजचे केळी बाजारभाव ; येथे मिळाला सर्वाधिक दर

केळी

पुणे : केळीची लागवड मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यात करण्यात येते. दरम्यान, केळीला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीला सर्वसाधारण दर हा 1750 रुपयांपर्यंत मिळाला. तर इतर काही बाजार समित्यांमध्ये केळीला चांगला दर मिळाला आहे. चला तर जाणून घेऊया आजचे केळी बाजारभाव..

 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, केळीला आज सर्वाधिक दर हा मुंबई फ्रुट मार्केटमध्ये मिळाला. या ठिकाणी सर्वसाधारण दर हा 4750 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त दर हा 5000 रुपये प्रति क्विंटल मिळाला. तसेच पुणे मोशी येथे देखील केळीला चांगला दर मिळाला असून जास्तीत जास्त दर हा 5000 रुपये प्रति क्विंटल मिळाला. दरम्यान नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीला सर्वसाधारण दर हा 1400 रुपये प्रति क्विंटल मिळाला.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

केळी (22/3/2024)

मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 430 4750
नाशिक क्विंटल 150 1400
नागपूर क्विंटल 23 525
पुणे क्विंटल 27 1100
पुणे-मोशी क्विंटल 53 3250
केळी (21/3/2024)
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 390 4500
नाशिक क्विंटल 170 1400
नागपूर क्विंटल 30 525
पुणे क्विंटल 14 1100
पुणे-मोशी क्विंटल 74 3250
यावल क्विंटल 11830 1750

 

 

Nirmal Seeds

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇