इतर

जळगाव जिल्ह्यासह या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात सातत्याने हवामानामध्ये बदल होत असून कुठे कडक ऊन तर कुठे पाऊस अशी स्थिती आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे.

 

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस
आज सकाळपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच छ. संभाजीनगर, पुणे, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून मुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे.

 

Jain Irrigation

 

पोळा अमावस्याला शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button