शासकीय योजना

आता ‘या’ योनजेसाठी मिळणार 100 टक्के अनुदान ; जाणून घ्या… संपूर्ण माहिती

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या आहे. त्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेचा देखील समावेश असून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आता 100 टक्के अनुदान मिळणार आहे. किती टप्प्यात दिले जाते अनुदान?, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता काय?, अर्ज कुठे करायचा? हे आपण जाणून घेणार आहोत.


भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्यात 2018-19 मध्ये सुरू करण्यात आली होती. शासनाच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबविली जात आहे. तसेच राज्यातील फळबागांचा विकास आणि फलोत्पादन वाढवे म्हणून ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून फळबाग शेतीला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

असे मिळणार अनुदान

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी हे अनुदान तीन टप्प्यात दिले जाते. पहिल्या वर्षात 50 टक्के अनुदान, दुसऱ्या वर्षात 30 टक्के अनुदान, तिसऱ्या वर्षात 20 टक्के अनुदान दिले जाते. लाभार्थ्याला दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लाभ घेण्यासाठी प्रमाण द्यावे लागणार आहे. यात लाभार्थ्याने लागवड केलेल्या झाडांच्या जीविताचे प्रमाण कोरडवाहूसाठी 80 टक्के आणि बागायतीसाठी 90 टक्के असणे आवश्यक आहे. मात्र, हे प्रमाण कमी झाले तर अशावेळी लाभार्थ्याने स्वखर्चाने झाडे आणून जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे ठेवावे लागेल.

Legend Irrigation

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार ही आवश्यक कागदपत्रे व पात्रता

कागदपत्रे –
सातबारा
सातबाऱ्यावर कुळाचे नाव, कुळाची संमती

पात्रता –
फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्याकडे ठिबक सिंचन संच असणे.
ज्या शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार.
या योजनेचा लाभ फक्त वैयक्तिक शेतकरी घेऊ शकतील.

Green Drop

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login (महाडीबीटी) या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. यानंतर लाभार्थी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. या व्यतिरिक्त लाभार्थी ऑफलाईन अर्ज देखील करू शकतो. आपल्या जवळच्या कृषी केंद्रात जाऊन या योजेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button