बाजार भाव

नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर झाल्याने दरात वाढ

पुणे : सध्या देशभरात कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्याने ही वाढ झाल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या परिस्थितीमुळे कांद्याच्या दरावर परिणाम झाला असून आज (दि. 8) रोजी आपण कांद्याला कोणत्या बाजार समितीत किती दर मिळाला ?, कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे जाणून घेणार आहोत. आज (दि. 8) रोजी कांद्याला पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वसाधारण दर हा 3 हजार 600 रुपये प्रति क्विंटल मिळाला तर आवक 10 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच वाई कृषी बाजार समितीत कांद्याला तीन हजार रुपये दर मिळाला.

 

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या दिवाळीनिमित्त दहा दिवस बंद राहणार आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांना कांदा विक्री ही दहा दिवसानंतरच करता येणार आहे. व्यापा-यांच्या खळ्यावरील कामगार हे दिवाळीनिमित्त सुट्टीवर जात असल्याने दरवर्षी दहा दिवस बाजार समित्या बंद असतात.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (8/11/2023)

पुणे -पिंपरी क्विंटल 10 3600
वाई क्विंटल 18 3000
कांदा (7/11/2023)
कोल्हापूर क्विंटल 3960 3000
अकोला क्विंटल 875 4000
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 576 3050
राहूरी क्विंटल 9130 2550
नाशिक क्विंटल 865 3500
लासलगाव – निफाड क्विंटल 2530 3250
लासलगाव – विंचूर क्विंटल 15100 3400
मालेगाव-मुंगसे क्विंटल 13000 3150
सिन्नर क्विंटल 1540 3800
सिन्नर – नायगाव क्विंटल 194 3350
कळवण क्विंटल 7800 3500
संगमनेर क्विंटल 1588 2525
चांदवड क्विंटल 5200 3360
मनमाड क्विंटल 2900 3100
कोपरगाव क्विंटल 1500 3625
श्रीरामपूर क्विंटल 937 3600
पिंपळगाव बसवंत क्विंटल 11700 3500
भुसावळ क्विंटल 17 4000

 

Panchaganga Seeds

 

 

 

OM Gayatari Nursery
OM Gayatari Nursery

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button