पशुसंवर्धन

राज्यातील लम्पी बाधितांपैकी 50 टक्के पशुधन रोगमुक्त – पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

मुंबई : राज्यामध्ये दि. 3 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील 2,151 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील 48,954 बाधित पशुधनापैकी 24,797 म्हणजे सुमारे 50 टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात पशुबळींची संख्या आता जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत लंपी आजाराने 326 जनावरे दगावली आहेत.

एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4





श्री. सिंह यांनी सांगितले की, राज्यातील बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 3 ऑक्टोबर अखेर 109.31 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून 105.62 लाख जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले आहे. अकोला, जळगाव, कोल्हापूर, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी 6 लाख लस मात्रा प्राप्त झाल्या आहेत. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण या आकडेवारी नुसार सुमारे 75.49 % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

Planto


राज्यात दि. 3 ऑक्टोबरअखेर जळगाव 326, अकोला 308, बुलडाणा 270, अहमदनगर 201, अमरावती 168, सातारा 144, पुणे 121, कोल्हापूर 97, धुळे 30, लातूर 19, औरंगाबाद 60, वाशिम 28, ठाणे 24, सोलापूर 22, सांगली 19, नांदेड 17, नंदुरबार 15, जालना 12, नाशिक 7, बीड 6, उस्मानाबाद 6, नागपूर 5, रायगड 4, यवतमाळ 2, पालघर 2, हिंगोली 1 व वर्धा 2 अशा एकूण 1,916 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती न बाळगता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच उपचार सुरू झाल्यास लम्पी आजाराचा सामना करता येतो. या आजारात मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. लम्पीचा प्रादुर्भाव पाहता सर्व पशुपालकांनी संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.

NIrmal Seeds


लम्पी आजाराबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना / तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय / जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. 1800–2339–418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 वर तत्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇






Related Articles

Back to top button