Home हॅपनिंग मधुकर गवळी, डॉ. भाग्यश्री पाटील यांना कै. वसंतराव नाईक पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे...

मधुकर गवळी, डॉ. भाग्यश्री पाटील यांना कै. वसंतराव नाईक पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान

वसंतराव नाईक पुरस्कार

मुंबई : वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जन्मदिनी व कृषिदिनानिमित्त यंदाचा वसंतराव नाईक पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ओम गायत्री समूहाचे अध्यक्ष मधुकर गवळी यांना भाजीपाला व रोपवाटिका संवर्धन आणि राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि.च्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. भाग्यश्री प्रसाद पाटील यांना आधुनिक फुलशेती या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण समारंभाला राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते. हा कार्यक्रम मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात संपन्न झाला.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇