मुंबई : मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर आज राज्यातील काही भागात सकाळीच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशभरात यंदा 106 % पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात आज काही ठिकाणी जोरदार तर कुठे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच पुढील तीन दिवस अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे लवकर आगमन झाले असून भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यातील काही भागांसाठी आज रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जळगावात आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
दि. 28 मे 2025 रोजी
रेड अलर्ट – सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर
ऑरेंज अलर्ट – यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, पुणे, रायगड
यलो अलर्ट – जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा


दि. 29 मे 2025 रोजी
ऑरेंज अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा
यलो अलर्ट – जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वासिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, कोल्हापूर

दि. 30 मे 2025 रोजी
ऑरेंज अलर्ट – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
यलो अलर्ट – जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर