Home हवामान अंदाज नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

मुंबई- महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असून पावसाचे संकट वाढले आहे. मंगळवारी, 7 जुलै रोजी सुद्धा राज्याच्या अनेक भागांत तुफानी पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील विविध भागांसाठी 4 ठिकाणी रेड अलर्ट, 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, नाशिकमध्ये तुफानी पावसाची शक्यता असून नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज तर घाट भागात रेड अलर्ट आहे. खान्देशात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता असलेले राज्यातील विभाग. आज गुजरातमध्ये सुद्धा तुफानी पावसाची शक्यता आहे.
पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता असलेले राज्यातील विभाग. आज गुजरातमध्ये सुद्धा तुफानी पावसाची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर नाशिक घाटमाथा परिसरात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील 'या' क्षेत्रासाठी आज "यलो अलर्ट"
उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ क्षेत्रासाठी आज “यलो अलर्ट”
जळगाव जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट
जळगाव जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट

पालघर, रायगडात अति मुसळधार

कोकण विभागात पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

पुणे, सातारा घाट भागात रेड अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रात पुणे घाटमाथा परिसरासाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा घाटमाथ्यावरही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट लागू केला आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या भागात जोरदार पावसाचा इशारा नसला तरी अधूनमधून सरी पडू शकतात.

अकोला, अमरावतीत ऑरेंज अलर्ट

विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून यलो अलर्ट लागू आहे. मात्र भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत पावसाची कोणतीही विशेष शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल