तांत्रिक

शेतातील कचरा ठरू शकतो कमाईचे साधन! कृषी अवशेषांचा असा करा स्मार्ट पुनर्वापर

भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीमधून मोठ्या प्रमाणात कृषी अवशेष (Agricultural Residues) निर्माण होतात. पिकांचे खोड, काडीकचरा, ऊसाचे पाचट, भाजीपाला अवशेष, फळबागांतील छाटणीचा कचरा, तण, पशुधनातील शेण व इतर जैविक अवशेष यांचा योग्य वापर न झाल्यास ते पर्यावरण आणि जमिनीच्या आरोग्यासाठी समस्या निर्माण करतात. अनेक ठिकाणी पिकांचे अवशेष जाळण्याची पद्धत अजूनही प्रचलित आहे, ज्यामुळे मृदेतील सेंद्रिय कर्ब नष्ट होतो आणि वायूप्रदूषण वाढते.

कृषी कचरा म्हणजे काय?
शेती व संलग्न व्यवसायांमधून निर्माण होणारे जैविक किंवा सेंद्रिय अवशेष म्हणजे कृषी कचरा होय.
यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो:
धान, गहू, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे अवशेष, कापूस व सोयाबीनचे खोड, ऊसाचे पाचट, फळबागांतील छाटणीचा कचरा, भाजीपाल्याचे अवशेष, पशुधनातील शेण व गोठ्यातील कचरा, कृषी प्रक्रिया उद्योगांतील जैविक अवशेष.


📞 Call Now

📞 Call Now

कृषी कचरा जाळण्याचे दुष्परिणाम
मृदा सुपीकतेत घट
काडीकचरा जाळल्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे नुकसान होते.
उपयुक्त सूक्ष्मजीवांचा नाश
जमिनीतील गांडुळे व उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात.
मल्चिंग
कार्बन डायऑक्साइड (CO₂), मिथेन (CH₄), नायट्रस ऑक्साइड (N₂O) यांसारखे हरितगृह वायू वातावरणात सोडले जातात.
मानवी आरोग्यावर परिणाम
धूरामुळे श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होतात.

कृषी कचरा व्यवस्थापनाच्या आधुनिक तंत्रज्ञान पद्धती
कंपोस्ट निर्मिती
पिकांचे अवशेष, शेणखत आणि घरगुती जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करता येते.
फायदे:
मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो,पाणी धारण क्षमता सुधारते,रासायनिक खतांची गरज कमी होते.

व्हर्मी-कंपोस्ट
गांडुळांच्या साहाय्याने कृषी अवशेषांचे उच्च प्रतीच्या सेंद्रिय खतामध्ये रूपांतर केले जाते.
उत्पादन कालावधी: ४५ ते ६० दिवस
महत्त्व :
सूक्ष्म अन्नद्रव्यांनी समृद्ध खत उपलब्ध होते.
मृदेची भौतिक रचना सुधारते.

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)


📞 Call Now

📞 Call Now

मल्चिंग
ऊसाचे पाचट, सोयाबीन किंवा कापसाचे अवशेष पिकांच्या ओळींमध्ये पसरवून माती झाकली जाते.
फायदे:
तण नियंत्रण, मृद आर्द्रता संवर्धन, तापमान नियंत्रण, सेंद्रिय कर्ब वाढ

बायोगॅस निर्मिती
शेण आणि जैविक कृषी कचऱ्यापासून बायोगॅस तयार करता येतो.
उपयोग:
स्वयंपाकासाठी इंधन,वीज निर्मिती,स्लरीचे सेंद्रिय खत म्हणून उपयोग

बायोचार तंत्रज्ञान
नियंत्रित तापमानात ऑक्सिजनच्या कमी उपस्थितीत कृषी अवशेषांचे ज्वलन करून बायोचार तयार केला जातो.
फायदे:
कार्बनचे दीर्घकालीन संचयन, मृदा सुपीकता वाढ, हरितगृह वायू उत्सर्जन कमी

हॅपी सीडर आणि सुपर स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टम (SMS)
धान व गव्हाच्या अवशेषांचे व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिक यंत्रे.
फायदे:
अवशेष न जाळता थेट पेरणी, इंधन व मजुरी बचत, मातीची गुणवत्ता सुधारणा


📞 Call Now

📞 Call Now

बायोडिकंपोजरचा वापर
सूक्ष्मजीव आधारित जैविक द्रावणाद्वारे पिकांचे अवशेष जलद कुजविणे,
कुजण्याचा कालावधी: साधारण २०–३० दिवस

महाराष्ट्रातील परिस्थिती
धुळे, नंदुरबार, जळगाव व उत्तर महाराष्ट्र भागात कापूस, मका, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर अवशेष निर्माण होतात. या अवशेषांचा वापर खालीलप्रमाणे करता येतो:
कंपोस्ट निर्मिती, पशुखाद्य, मशरूम उत्पादन, बायोगॅस निर्मिती, मल्चिंग, जैवऊर्जा उत्पादन

शेतकरी आणि महिला बचत गटांची भूमिका
कृषी अवशेष संकलन केंद्र स्थापन करणे, कंपोस्ट आणि व्हर्मी-कंपोस्ट उत्पादन, बायोडिकंपोजर वापर प्रशिक्षण, कृषी कचऱ्यावर आधारित लघुउद्योग उभारणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत (FPO) कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन

श्रीमती अमृता राऊत
शास्त्रज्ञ – कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी
कृषी विज्ञान केंद्र, धुळे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button